Rajasthan Children Drowned : सुट्टीच्या दिवशी शेततळ्यात पोहायला गेली पाच भावंडे, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना

गावातील एका शेतात बांधलेल्या शेततळ्यात बुडून 5 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला आहे. सर्व एकाच कुटुंबातील होती. दोन मुलगे हे सख्खे भाऊ होते तर मुली त्यांच्या चुलत आणि मामे बहिणी होत्या.

Rajasthan Children Drowned : सुट्टीच्या दिवशी शेततळ्यात पोहायला गेली पाच भावंडे, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 31, 2022 | 7:45 PM

श्रीगंगानगर : राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच मुलां (Children)चा शेततळ्यात बुडून (Drowned) मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेली दोन्ही मुले सख्खे भाऊ (Sibling) होते. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रामसिंगपूर पोलीस घटनास्थळी धाव घेत मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले. पाचही मृतदेह रामसिंगपूर रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत. घटनास्थळी व रुग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली आहे.

सर्व मुले एकमेकांची चुलत भावंडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगरच्या अनुपगड उपविभागातील रामसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील उदासर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गावातील एका शेतात बांधलेल्या शेततळ्यात बुडून 5 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला आहे. सर्व एकाच कुटुंबातील होती. दोन मुलगे हे सख्खे भाऊ होते तर मुली त्यांच्या चुलत आणि मामे बहिणी होत्या. अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी रामसिंगपूर रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक प्रशासकीय अधिकारीही रुग्णालयात पोहोचले आहेत. दुर्घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत.

सुट्टीचा दिवस असल्याने मुले खेळायला गेली होती

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुले शेतात बांधलेल्या शेततळ्याजवळ खेळायला गेली होती. यानंतर सर्व जण अंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज नसल्याने एक एक करून पाचही मुलं पाण्यात बुडाली. बुडताना मुलांनीही आरडाओरडाही केला, मात्र आजूबाजूला कोणीही ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित नव्हते. त्यामुळे मुलांच्या मदतीसाठी कोणीही पोहोचू शकले नाही. गावकरी व नातेवाईक तेथे पोहोचले तोपर्यंत उशीर झाला होता. (Five siblings of the same family drowned while swimming in the farm on a holiday)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें