आधी चेला, आता गुरुच अडचणीत; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची दुसऱ्यांदा चौकशी

अँटालिया स्फोटकप्रकरणी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे एनआयच्या कोठडीत असतानाच आता वाझे यांचे गुरु आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचीही एनआयएकडून चौकशी करण्यात येत आहे. (Former cop Pradeep Sharma quizzed by NIA in Antilia case)

आधी चेला, आता गुरुच अडचणीत; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची दुसऱ्यांदा चौकशी
चकमक फेम प्रदीप शर्मा
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 3:38 PM

मुंबई: अँटालिया स्फोटकप्रकरणी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे एनआयच्या कोठडीत असतानाच आता वाझे यांचे गुरु आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचीही एनआयएकडून चौकशी करण्यात येत आहे. सलग दुसऱ्यांदा शर्मा यांची चौकशी करण्यात येत असून ते तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शर्माही अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Former cop Pradeep Sharma quizzed by NIA in Antilia case)

सचिन वाझेंनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये प्रदीप शर्मा यांचं नाव घेण्यात आलं होतं. त्याआधारे एनआयएने शर्मा यांना चौकशीसाठी बोलावलं. अँटालिया बाहेर ठेवण्यात आलेल्या जिलेटीन पुरवण्याच्या प्रकरणात शर्मा सतत संशयाच्या भोवऱ्यात होते. त्यामुळेच त्यांची सलग दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे. शर्मा यांचे वाझेंसोबतचे संबंध कसे होते? जिलेटीन कटात त्यांचा काही संबंध आहे का? याबाबत त्यांचा तपास करण्यात येत आहे. तसेच शर्मा आणि वाझेंची पहिली भेट सीआययू कार्यालयात आणि नंतर 3 मार्च रोजी जेबी नगर येथे झाली होती. सीमकार्ड लोकेशनवरून या दोघांच्या भेटीचं रहस्य उलगडलं आहे. याच सीमकार्डवरून मनसुख हिरेनला फोन केला गेला होता. त्यामुळे सर्व प्रकारच्या शक्यता तपासण्यासाठी शर्मा यांची चौकशी केली जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शर्मा यांची चौकशी केली जात आहे. पण ते चौकशीला सहकार्यच करत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. अडचणीचे प्रश्न विचारले जात असल्यामुळेच शर्मा हे चौकशीला सहकार्य करत नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

वाझेंची सीबीआय चौकशी

एनआयएच्या ताब्यात असलेल्या वाझेंची आज सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या टीमने एनआयए कार्यालयात जाऊन सलग दुसऱ्या दिवशी वाझेंची चौकशी सुरू केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते का? याबाबत ही चौकशी सुरू आहे. तसेच वाझेंनी एनआयए कोर्टाला दिलेल्या पत्रातील काही मुद्द्यांवरही वाझेंची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री अडचणीत येऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.

‘त्या’ लेटरसाठी शर्मांनी वाझेंना मदत केल्याचा संशय

सचिन वाझे 3 तारखेला तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना भेटून अंधेरी परिसरात गेले होते आणि तिथे त्यांनी शर्मा यांची भेट घेतली होती अशीही चर्चा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्फोटके प्रकरणात ज्या ‘जैश उल हिंद’ दहशतवादी संघटनेने स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली होती, त्या लेटरसाठी प्रदीप शर्मा यांनी वाझेंना मदत केली असा संशय NIA ला आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा ?

एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी 113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव 1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती 2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू आलं 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती  (Former cop Pradeep Sharma quizzed by NIA in Antilia case)

संबंधित बातम्या:

जेबी नगर लोकेशनवरुन दुवा जुळला, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या रडारवर

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी, गुन्हा दाखल

अंबाजोगाईच्या ‘त्या’ कपलचं अमेरिकेत काय झालं?; नवऱ्यानेच बायकोला भोसकलं?, वाचा सविस्तर

(Former cop Pradeep Sharma quizzed by NIA in Antilia case)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.