Breaking : माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी संबंधित 234 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 17, 2021 | 8:43 PM

माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्तीची मोठी कारवाई सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने केली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विवेक पाटील यांची जवळपास 234 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. विवेक पाटील हे कर्नाळा बँकेचे माजी चेअरमन आहेत. या बँकेत सुमारे 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता.

Breaking : माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी संबंधित 234 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर जप्तीची कारवाई

Follow us on

नवी मुंबई : माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्तीची मोठी कारवाई सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने केली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विवेक पाटील यांची जवळपास 234 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. विवेक पाटील हे कर्नाळा बँकेचे माजी चेअरमन आहेत. या बँकेत सुमारे 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा आरोप विवेक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. 2008 साली हा घोटाळा उजेडात आला होता. त्याबाबत आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. (Former MLA Vivek Patil’s assets worth Rs 234 crore seized from ED in money laundering case)

नेमकं प्रकरण काय?

कर्नाळा बँकेत 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते.

यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांना ईडी कार्यालयात बोलवलं होतं. दोन्ही आमदारांनी आपले म्हणणे ईडी कार्यालयात जाऊन मांडले होते. घोटाळ्यासंदर्भातील पुरावे सादर केले असल्याची माहिती पुढे आली होती. ईडीच्या चौकशीमुळे बँक आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर आता टांगती तलवार होती.

कर्नाळा बँक अध्यक्ष, संचालकांसह 76 जणांविरुद्ध गुन्हा

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

गुन्हे दाखल होऊनही ठेवीदारांच्या पैशांबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, म्हणून आम्ही ईडी कार्यलयात गेलो होतो. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण यात खूप मोठं मनी लॉड्रिंग झाले आहे, असा आरोप प्रशांत ठाकूर यांनी केला होता.

इतर बातम्या :

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, मुलीनंतर आता पत्नी मंदाकिनी खडसेंनाही ईडीकडून समन्स

वयोवृद्ध महिलेला निद्रानाश, घरात सून-नात असताना बाल्कनीत टोकाचं पाऊल, आत्महत्या की घातपात? नागपुरात खळबळ

Former MLA Vivek Patil’s assets worth Rs 234 crore seized from ED in money laundering case

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI