Satara | गर्भवती महिला वनसंरक्षकास मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला अखेर बेड्या, आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर कारवाई

Satara | गर्भवती महिला वनसंरक्षकास मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला अखेर बेड्या, आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर कारवाई
SATARA POLICE

धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 4 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या होत्या. याप्रकरणी आता सातारा तालुका पोलिसांनी (Police) संबंधित माजी सरपंच रामचंद्र जानकर यास अटक केलं आहे. वनसंरक्षक दांपत्याने मजूर दुसरीकडे नेले असल्याच्या रागातून माजी सरपंचाने हे कृत्य केले होते. संबंधित माजी सरपंच हा वन समितीचा अध्यक्ष आहे. या सखोल तपास पोलीस करत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 20, 2022 | 1:44 PM

सातारा : साताऱ्यात (Satara) पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हा संतापजनक प्रकार महाराष्ट्रभर (Maharashtra) वाऱ्यासारखी पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 4 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या होत्या. याप्रकरणी आता सातारा तालुका पोलिसांनी (Police) संबंधित माजी सरपंच रामचंद्र जानकर यास अटक केलं आहे. वनसंरक्षक दांपत्याने मजूर दुसरीकडे नेले असल्याच्या रागातून माजी सरपंचाने हे कृत्य केले होते. संबंधित माजी सरपंच हा वन समितीचा अध्यक्ष आहे. या सखोल तपास पोलीस करत आहेत.

न विचारता मजूर दुसरीकडे नेले म्हणून मारहाण

मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

…तर राज्य कसं सांभाळणार ?

दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. साता-यात पळसेवडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यानं गर्भवती वनरक्षक महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केलीय. अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहीजे असे त्यांनी म्हटले आहे. इतकंच नव्हेतर या प्रकरणावरून शंभूराज देसाई यांच्यावरही निशाणा साधला आहे. शंभूराज देसाईजी तुम्ही गृहराज्यमंत्री.. तुम्हालाच स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार ? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तसेच या घटनेची दखल पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली असून आरोपीला कठोर कायद्याचा सामना करावा लागणार , अशी कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत. असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

इतर बातम्या :

बोकडाऐवजी कापला माणसाचा गळा, दारुच्या नशेत क्रुर कृत्य; देवीच्या दरबारात हत्या

Chandrapur | कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणीकडे मागावी?, ब्रम्हपुरीत पोलीस शिपायाचा विवाहितेवर अत्याचार

Pune crime | पुणे पोलिस आयुक्तांची कोथरूडमधील घायवळ टोळीतील तिघांवर ‘मोक्का’तंर्गत कारवाई


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें