Chandrapur | कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणीकडे मागावी?, ब्रम्हपुरीत पोलीस शिपायाचा विवाहितेवर अत्याचार

Chandrapur | कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणीकडे मागावी?, ब्रम्हपुरीत पोलीस शिपायाचा विवाहितेवर अत्याचार
ब्रम्हपुरीत बलात्काराचा आरोप असलेला पोलीस

पोलिसांचे काम जनतेचे रक्षण करणे असे आहे. पण, काही पोलीस त्याला अपवाद ठरतात. असेच एक प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीत उघडकीस आले. एका विवाहित महिलेच्या निरागसतेचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.

निलेश डाहाट

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 20, 2022 | 11:57 AM

चंद्रपूर : ब्रह्मपुरीत पोलीस शिपायाने एका विवाहित महिलेवर बलात्कार केला. सध्या पाथरी पोलीस स्टेशनमध्ये हा पोलीस शिपाई कार्यरत आहे. ब्रह्मपुरी येथील टिळक नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केला. लालश्याम बाबुराव मेश्राम (वय 51) असे अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे. महिला पतीपासून विभक्त असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तिच्याभोवती आपले फास टाकले. संबंधांचे आक्षेपार्ह फोटोज आणि मेसेज अत्याचारग्रस्त महिलेला पाठविले. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लालश्याम मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली.

ब्रम्हपुरी पोलिसांकडे तपास

सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई लालश्याम मेश्राम याने ब्रह्मपुरी येथील एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. पीडित महिलेने ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. तक्रारीवरून लालश्याम मेश्राम यांच्या विरोधात भारतीय दंड संहिताचे माहिती व तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.

महिलेला आक्षेपार्ह फोटोज पाठवायचा

सहा महिन्यांपूर्वी लालश्याम मेश्राम हा ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला कर्तव्यावर होता. या दरम्यान पीडित महिलेची ओळख झाली. मात्र या ओळखीचा गैरफायदा पोलीस शिपायाने उचलला. त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अशी तक्रार संबंधित महिलेने केली आहे. अत्याचाराचे आक्षेपार्ह फोटोज आणि मेसेज अत्याचारग्रस्त महिलेला पाठवत होता. तिला हा पोलीस स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागवत होता. शेवटी त्याच्या जाचाला कंटाळून या महिलेने तिच्या अहायतेचा फायदा घेत असल्याने तिने ब्रम्हपुरी पोलिसांत तक्रार केली. तपासात त्यांच्यामधील संबंधाचा अधिक खुलासा होईल. या घटनेमुळं पोलीस विभागाच्या इभ्रतीचे वाभाडे निघाले.

NMC Election | नागपूर भाजपात कोण करतंय गुलाम बनविण्याचा प्रयत्न; अविनाश ठाकरे यांच्या पोस्टने खळबळ, पोस्ट नेमकी काय?

Gondia ZP Election | प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेसच्या नाना पटोले यांनाही धक्का!

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें