AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anmol Bishnoi arreste : मोठी बातमी! गँगस्टर लॉरेन्स बिश्रोईचा भाऊ अनमोलला अटक

मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोला अटक करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे त्याला कॅलीफोर्नियामधून अटक करण्यात आलं.

Anmol Bishnoi arreste : मोठी बातमी! गँगस्टर लॉरेन्स बिश्रोईचा भाऊ अनमोलला अटक
| Updated on: Nov 18, 2024 | 7:05 PM
Share

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आलं आहे. मात्र अद्याप या प्रकरणात मुंबई किंवा दिल्ली पोलिसांचं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता अटक करण्यात आली आहे. अनमोल बिश्नईला अमेरिकेच्या कॅलीफोर्नियामधून अटक करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आता अमेरिकन सरकार अनमोल बिश्नोईला भारताच्या स्वाधीन करणार आहे. प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग आला आहे. भारत सरकारकडून अनमोल बिश्नोईला भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अनमोल बिश्नोईच्या अटकेनंतर आता अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता, या प्रकरणात अनमोल बिश्नोई वॉन्टेड आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा समावेश हा मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.त्याचा शोध सुरू असतानाच त्याला अमेरिकेतून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता अटक करण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दसऱ्याच्या दिवशी तीन हल्लेखोरांनी त्यांच्या हल्ला कोला होता. त्यातील दोघांना पोलिसांनी तातडीनं पकडं तर मुख्य हल्लेखोर फरार झाला होता, त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात देखील बिश्नोई गँगच कनेक्शन समोर आलं होतं. अखेर आता अनमोल बिश्नोईल अटक करण्यात आली आहे, त्याच्या अटकेनंतर काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान