मनगटाची नस कापून प्रेयसी वाचली, पण असं काहीही न करता अर्जुनचा तिच्यासमोरच दुर्देवी मृत्यू

मुलीने मनगटाची नस कापून घेतल्यानंतर तो व्हिडिओ प्रियकराला पाठवला. त्याने लगेच तिला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. पण या सगळ्यामध्ये त्या प्रियकराचा मृत्यू झाला. नेमकं घडलं काय?

मनगटाची नस कापून प्रेयसी वाचली, पण असं काहीही न करता अर्जुनचा तिच्यासमोरच दुर्देवी मृत्यू
break up
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 3:02 PM

प्रेम प्रकरणात मन सुन्न करणारी एक घटना समोर आली. प्रेयसीने मनगटाची नस कापून घेतली. तिच्या हातातून भळाभळा रक्त वाहत होतं. या घटनेमध्ये ती मुलगी वाचली. पण तिच्यासमोर प्रियकराने प्राण सोडले. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना दिल्लीच्या जगतपुरी भागात घडली आहे. मुलीने मनगटाची नस कापून घेतल्यानंतर तो व्हिडिओ प्रियकराला पाठवला. त्याने लगेच तिला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. पण या सगळ्यामध्ये त्या प्रियकराचा मृत्यू झाला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याची वर्षभरापूर्वी ऑनलाइन ओळख झाली होती. त्यांच्यात नियमित चॅटिंग सुरु झाली. ते प्रेमात पडले आणि डेटिंग सुरु झालं. दोघे बाहेर एकमेकांना भेटू लागले. प्रेमात भांडणं सुद्धा होतात. तशीच त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषयावरुन भांडण होऊ लागली. अर्जुन स्वत:साठी नोकरी शोधत नव्हता. त्याला नेहमी पार्टी करायची सवय होती. मुलगी कायद्याचा अभ्यास करत होती. ती तिच्या करियरबद्दल गंभीर होती.

त्याने गर्लफ्रेंडकडे पाहिलं, ते शेवटचच

शुक्रवारी सुद्धा त्यांच्यात भांडणं झाली. अर्जुनच्या एका नातेवाईकाबरोबर भांडून ती घरी गेली. रात्री तिने स्वत:च्या मनगटाची नस कापून घेतली. तिने या सगळ्याचा व्हिडिओ बनवला व अर्जुनला व्हॉट्स अपवर पाठवला. हा व्हिडिओ पाहून अर्जुनला धक्का बसला. त्याने लगेच मुलीच्या आईला याबद्दल कळवलं. जेणेकरुन तिला मदत मिळेल. तिला रात्री पावणेतीनच्या सुमारास गुरु तेग बहाद्दूर रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर अर्जुनने जे काही घडलं, ते नर्सला सांगितलं. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडकडे पाहिलं, ते शेवटचच. तो लगेच तिथे कोसळला.

अर्जुनचे शेवटचे शब्द काय होते?

डॉक्टर त्याच्या गर्लफ्रेंडवर उपचार करत असताना त्यांनी अर्जुनवर सुद्धा उपचार सुरु केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी मुलीच्या मनगटातून होणारा रक्तस्त्राव थांबवला. पण अर्जुनचा कार्डियक अरेस्ट म्हणजे ह्दयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला. ‘तिला वाचवा, ती मरेल’ हे त्याचे शेवटचे शब्द होते. शवविच्छेदनानंतर अर्जुनचा मृतदेह कुटुंबियांकडे देण्यात आला. मुलीने अजून तिची जबानी दिलेली नाही. तिच्या प्रकृतीत सुधारणा होतेय.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.