AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Crime : गोव्यात सिद्धी नाईक प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या! मिरामार किनाऱ्यावर तरुणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

Miramar Beach Dead body News : मृतदेह हा 25 ते 30 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज बांधला जातो आहे.

Goa Crime : गोव्यात सिद्धी नाईक प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या! मिरामार किनाऱ्यावर तरुणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ
गोव्यात खळबळ...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 11:21 AM
Share

पणजी : गोव्यात पुन्हा एकदा सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. वर्षभराच्या आतच गोव्यात (Goa Crime News) पुन्हा एकदा किनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. गोव्यातील प्रसिद्ध मिरामार समुद्र (Miramar Beach News) किनाऱ्यावर महिलेचा मृतदेह आढळून आलाय. पणजीच्या जवळ असलेल्या मिरामार समुद्र किनाऱ्यावर महिलेचा मृतेदह तरंगताना आढलून आला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यानंतर स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास करण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या किनाऱ्यावर सिद्धी नाईक या मुलीचाही विचित्र अवस्थेत मृतदेह (Dead body at Miramar Beach) आढळून आला होता. त्यानंतरही गोव्यात एकच खळबळ उडालेली. काही महिने हे प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका तरुणीचा मृतदेह गोव्याच्या किनाऱ्यावर आढळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

मृत महिला भारतीय की विदेशातील?

गोव्याच्या मिरामार किनाऱ्यावर आढळून आलेल्या तरुणीचा मृतदेह हा 25 ते 30 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज बांधला जातो आहे. मुसळधार पावसामुळे आधीच पणजीतील किनाऱ्याजवळील अनेक हॉटेल्स बंद आहेत. फारशी वर्दळही मिरामार किनाऱ्यावर नसते. अशात हा मृतदेह नेमका कुणाचा आहे? याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. मृत महिला भारतीय असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जातो आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि स्थानिकांची चौकशी करत पोलीस पुढील शोध घेत आहेत.

हत्या की आत्महत्या?

मिरामार समुद्रकिनारा हा गोव्याच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. गोव्यातील इतर गजबजेल्या समुद्र किनाऱ्यांच्या तुलनेत मिरामार समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी कमी असते. दरम्यान, आता या महिलेनं आत्महत्या केली, तिचा बुडून मृत्यू झाला की ही हत्या आहे? याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय. सध्या पणजी पोलिसांकडून याप्रकरणी वैद्यकीय तज्ज्ञाच्या मदतीने तपास केला जातोय.

सिद्ध नाईक प्रकरणाच्या आठवणी ताज्या

12 ऑगस्ट 2021 रोजी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर सिद्धी नाईक हीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सिद्धीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली? यावरुन अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. तिच्या मृत्यूचं गूढ कायम असतानाच तिच्या मृत्यूप्रकरणी प्रेम प्रकरण, घरातील वाद, असेही अनेक धागेदोरे तपासातून समोर आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा गोव्याच्या किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं अनेक तर्क वितर्कांना उधाण आलंय.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.