दोन पोरांचा बाप! परस्पर केली जेंडर चेंज सर्जरी, पत्नीला त्या रात्री कळाल अन्… नेमकं काय घडलं?
दोन मुलाच्या बापाने लग्नानंतर 7 वर्षांनी गुपचूप बदलले लिंग, अनेक वर्षे बायकोलाही समजलं नाही. जेव्हा समजलं तेव्हा बायकोच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं?

Crime News : सध्या सोशल मीडियावर अशा धक्कादायक घटना समोर येत आहेत, जे पाहून अनेकांना विश्वास देखील बसत नाही. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे जी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात घडली आहे. ही एक अत्यंत धक्कादायक घटना असून ती चर्चेचा विषय ठरत आहे. येथे दोन लहान मुलींच्या वडिलांनी कोणालाही कल्पना न देता गुपचूप लिंग परिवर्तन करून महिला बनल्याचा आरोप पत्नीने केला आहे. विवाहाच्या तब्बल सात वर्षांनंतर ही बाब समोर आल्यानंतर पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली असून तिने थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
सध्या हे प्रकरण गोरखपूर जिल्ह्यातील बांसगांव परिसरातील आहे. ज्यामध्ये पीडित पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार तिचे लग्न सात वर्षांपूर्वी झाले असून त्यांना दोन मुली आहेत. पत्नीचा आरोप आहे की तिचा पती दिल्लीतील एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी तो दिल्लीला गेला आणि तेथेच त्याने गुपचूप लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेतली. मात्र, या मोठ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या निर्णयाची कोणतीही माहिती त्याने पत्नीला किंवा कुटुंबीयांना दिली नाही.
मेडिकल कागदपत्रांमुळे घटना उघडकीस
पत्नीच्या म्हणण्यानुसार, अलीकडेच तिच्या हाती काही वैद्यकीय कागदपत्रे लागली. ती पाहिल्यानंतर या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला. पतीने आपले लिंग परिवर्तन करून घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पत्नी पूर्णपणे घाबरून गेली.
तिने थेट न्यायालयात धाव घेतली. ज्यामध्ये तिने दाखल केलेल्या अर्जात पत्नीने पतीवर अनेक गंभीर आरोप केले. तिचा दावा आहे की लग्नानंतरपासूनच पतीचे वर्तन असामान्य होते. तो वारंवार शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ करत असे. तसेच, तो स्वतः आपल्या मित्रांसोबत अनैतिक संबंध ठेवत होता आणि पत्नीवरही तसे संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता असा गंभीर आरोप तिने केला आहे.
पत्नीचा आरोप आहे की गेल्या वर्षी पतीने तिला निर्दयपणे मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर ती आपल्या दोन मुलींना घेऊन त्यांच्या भवितव्याच्या चिंतेत भटकत होती.
या प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा पत्नीने न्यायालयात भरण-पोषण आणि मानसिक त्रासाबद्दल न्यायालयात मागणी केली आहे. तिने स्वतःसाठी तसेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींसाठी आर्थिक सुरक्षिततेची मागणी केली आहे. दरम्यान, पतीच्या बाजूनेही न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून, पत्नीने केलेले सर्व आरोप पूर्णतः खोटे आणि निराधार असल्याचा दावा पतीने केला आहे.