AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्ज मिळवून देतो सांगत नागरिकांना घालायचे गंडा, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

कर्ज मिळवून देण्यासाठी कागदपत्रं घ्यायचा. कर्ज मिळवायचा पण कर्जाची रक्कम घेऊन फरार व्हायचा. आरोपीने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

कर्ज मिळवून देतो सांगत नागरिकांना घालायचे गंडा, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूकImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 15, 2023 | 12:36 PM
Share

मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या नराधमाला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. आदेश आनंद जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध मुंबईतील गोरेगाव, कुरार, खार, पवईसह इतर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. कर्ज मिळवून देण्यासाठी कागदपत्रं घ्यायचा. कर्ज मिळवायचा पण कर्जाची रक्कम घेऊन फरार व्हायचा. आरोपीने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

‘असा’ उघड झाला गुन्हा

फिर्यादी महिला मनिषा हांडे या महिलेला गावचे घर दुरुस्ती करण्यासाठी पैशांची गरज होती. यासाठी मनिषा आणि त्यांचे पती विविध बँकेत चकरा मारत होते. मात्र त्यांना कर्ज मिळत नव्हते. याचदरम्यान त्यांची ओळख आदेश जाधव याच्याशी झाली.

आदेशने सदर महिलेला वैयक्तिक कर्ज मिळवून देतो असे सांगितले. यासाठी त्याने महिलेकडून कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे घेतली. यानंतर काही दिवसांनी महिलेच्या घरी फेडरल बँकेचे वन नावाचे कार्ड आले.

याबाबत त्यांनी आरोपीला विचारले असता हे कार्ड कर्ज मिळवण्यासाठी उपयोगाचे असल्याचे सांगितले. मग दोन दिवसांनी आरोपीने महिलेच्या घरी येऊन कार्डचे फोटो काढून घेऊन गेला. काही दिवसांनी फेडरल बँकेकडून महिलेला कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी फोन येऊ लागले.

पीडित महिला वारंवार याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपीला फोन करत होती, मात्र त्याचा फोन बंद येत होता. अखेर महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी फसवणुकीची तक्रार दाखल करत तपास सुरु केला.

पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर याआधीही मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच