AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवी पास बोगस डॉक्टर करत होते रुग्णांवर उपचार, 80 हजारांत घेतली पदवी, एक-दोन नव्हे 14 बनावट डॉक्टरांचा भांडाफोड

Fake doctors arrested: बनावट डॉक्टरांची माहिती लोकांना मिळाली. त्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि पदवींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाची माहिती रॅकेटला मिळाली. त्यानंतर त्यांनी आपली योजना बदलली.

आठवी पास बोगस डॉक्टर करत होते रुग्णांवर उपचार, 80 हजारांत घेतली पदवी, एक-दोन नव्हे 14 बनावट डॉक्टरांचा भांडाफोड
पोलिसांनी पकडलेले बनावट डॉक्टर
| Updated on: Dec 06, 2024 | 4:26 PM
Share

Fake doctors arrested: केवळ आठवी आणि बारावी पास करणारे युवकांनी रुग्णांचा जीवाशी खेळ चालवला होता. 60,000 ते 80,000 रुपयांमध्ये बनावट डॉक्टरांची पदवी घेऊन प्रॅक्टीस सुरु केली होती. गुजरात पोलिसांना या टोळाची सुगावा लागला. त्यांनी सुरतमध्ये छापा टाकून 14 बोगस डॉक्टरांना अटक केली. अटक करण्यात आलेला टोळीचा प्रमुख रमेश आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोर्ड ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसिन (बीईएचएम) च्या नावाने बोगस पदव्या देत होता. तपासणी करताना एकूण 1,500 पेक्षा जास्त बनावट पदव्या मिळाल्या. तसेच रजिस्ट्रेशन फॉर्म, डॉक्टरांचे रजिस्ट्रेशनचे रजिस्टर, मार्कशीट, बीईएमएसची डिग्री, आयडी कार्ड, कोरे सर्टिफिकेट, सर्टिफिकेटच्या झेरॉक्स 15, रिन्यूअल फॉर्म 8 मिळाले.

पैसे भरल्यावर 15 दिवसांत पदवी

पोलिसांनी ही कारवाई पांडेसरा तुळसी धाम सोसायटीत कविता क्लिनिक, ईश्वर नगर सोसायटीमध्ये श्रेयान क्लिनिक, रणछोड नगरमधील प्रिन्स क्लिनिकवर केली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात बनावट पदव्या घेऊन अनेक जण आपले क्लिनिक चालवत होते. बनावट पदवी असलेले तीन जण अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील सूत्रधारांनी एक बोर्डाचे गठत केले होते. त्यासाठी पाच जणांची नियुक्ती बोर्डात केली होती. 70 हजार रुपयांमध्ये ही लोक प्रशिक्षण देत होते. पैसे भरल्यानंतर 15 दिवसांत पदवी दिली जात होती. दरवर्षी डॉक्टरांना नूतनीकरणासाठी 5,000 ते 15,000 रुपये द्यावे लागत होते.

लोकांना माहिती मिळाल्यावर रॅकेटचा दुसरा उद्योग

बनावट डॉक्टरांची माहिती लोकांना मिळाली. त्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि पदवींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाची माहिती रॅकेटला मिळाली. त्यानंतर त्यांनी आपली योजना बदलली. या रॅकेटने गुजरात आयुष विभागाने जारी केलेल्या पदव्या देण्यास सुरुवात केली. बीईएचएम बोर्ड आणि गुजरातच्या आयुष विभागाने करार केला असल्याचा दावा केला. या प्रमाणपत्रामुळे ॲलोपॅथी, होमिओपॅथीचा सराव करू शकतात, असा दावा करण्यात आला.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.