गाढवांची चोरी, पोलिसांसमोर मालकाने असे काही केले की सर्वच हैरान

पोलिसांनी सांगितले की, मालाराम रेबारी यांनी सागवाडा पोलिस ठाण्यात गाढवाच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गाढवाचा शोध घेतला. यावेळी पोलिसांनी गाढवांचा कळप पकडला आहे.

गाढवांची चोरी, पोलिसांसमोर मालकाने असे काही केले की सर्वच हैरान
donkey
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 3:52 PM

प्राण्यांची चोरी झाले तर ओळखणे अवघड असते. त्या प्राण्यावर दावा करण्यासाठी मालकाकडे काहीच पुरावे नसतात. परंतु राजस्थानमध्ये अनेक गाढावांची चोरी झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. मग पोलिसांसमोर गाढवाच्या मालकाने असे काही केले की एक, एक गाढव त्याच्याकडे येऊन थांबू लागले. हा सर्व प्रकार पाहून पोलीससुद्धा हैरान झाले. त्याचवेळी मालक आणि प्राणी यांच्यातील प्रेमाची चर्चा होऊ लागली.

गाढवाच्या मालकाने नावाने बोलवले…

राजस्थानमध्ये गाढवांच्या कळपातून गाढवांची चोरी झाली. डुंगरपूर जिल्ह्यातील सागवाडा पोलिसांकडे हे चोरीचे प्रकरण गेले. पोलिसांनी गाढवांचा कळप पकडला. पण ही गाढव कोणाची? हे कसे सिद्ध करावे. मग चोरीला गेलेल्या गाढवाच्या मालकाने आपल्या गाढवाला ‘आये भुरिया’ नावाने हाक मारली. त्यामुळे भुरिया नावाच्या गाढवाने लगेच मालकाचा आवाज ओळखला आणि त्याच्याकडे धाव घेतली. मग मालकाने कळपातील सर्व 9 गाढवांना एक एक करून नावाने बोलावले. ते ही मालकाकडे आले. या घटनेची चर्चा परिसरात होत आहे.

पोलिसांनी केली आरोपीला अटक

पोलिसांनी सांगितले की, मालाराम रेबारी यांनी सागवाडा पोलिस ठाण्यात गाढवाच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गाढवाचा शोध घेतला. यावेळी पोलिसांनी गाढवांचा कळप पकडला आहे. 50 गाढवांचा कळप पाहून पोलिसांना प्रश्न पडला की खरे गाढव कसे ओळखायचे? मग मालकाने गाढवांच्या कळपातून आपल्या एका गाढवाचे नाव पुकारले. तेव्हा ते गाढव मालकाचा आवाज ओळखत त्यांच्याकडे आले. या प्रकारे मालकाने आपल्या नऊ गाढवांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारली आणि ती सर्व कळपातून बाहेर आली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी सांगितले की, त्यांना गाढवाच्या चोरीचा व्हिडिओ सापडला आहे. त्या आधारे पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचले. यावेळी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने गाढवाची चोरी केल्याचे मान्य केले. या प्रकणात पोलिसांनी राजू हिरालाल कालबेलिया यांना अटक केली आहे.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.