मेडिकल स्टोअर मालकाची निर्घृण हत्या, गाडीतच गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह

कारच्या आत युनूसचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत पडला होता. युनूसला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मेडिकल स्टोअर मालकाची निर्घृण हत्या, गाडीतच गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह
प्रातिनिधीक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 07, 2021 | 3:53 PM

चंदिगढ : हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. केमिस्ट दुकानातून घरी परतणाऱ्या दुकानदाराचा मृतदेह त्याच्याच कारमध्ये आढळला आहे. बुधवारी रात्री उशिरा नेहमीप्रमाणे युनूस दुकान बंद करुन घरी परतत होता. त्यावेळी कोणीतरी त्याची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिकांनी त्याची कार थर्मल कॉलनीजवळ रस्त्यावर उभी असल्याचे पाहिले. त्यानंतर युनूसचा मृतदेह कारमध्येच रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं काही जणांना दिसलं. युनूस खानचा भाऊ आलिम थर्मल कॉलनीमध्ये नोकरी करतो. युनूस खान गेल्या काही काळापासून त्याच्यासोबतच राहत होता.

काय आहे प्रकरण?

युनूस हा मूळचा उत्तर प्रदेशातील बरेलीचा रहिवासी होता, पण गेल्या काही काळापासून तो यमुनानगरच्या बाड्डी माजरा भागात केमिस्टचे दुकान चालवत होता. तो थर्मल कॉलनीत त्याचा भाऊ आलिमच्या घरी राहत होता. बुधवारीही तो त्याचा भाऊ आलिमच्या घरी जात होता. पण त्याची कार जिचा नंबर UP 25 CQ 2532 असा आहे, ती थर्मल कॉलनीच्या मुख्य गेटपासून थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला तिरकी उभी असल्याचे आढळले.

कारमध्ये गळा चिरलेला मृतदेह

एका वाटसरुने आलिमला फोन करुन याबाबत माहिती दिली. जेव्हा तो घटनास्थळी पोहचला, तेव्हा कारच्या आत युनूसचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत पडला होता. युनूसला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि या खुनाचे गूढ उकलण्यास सुरुवात केली.

तपासात उघड झाले की, युनुस खानच्या मानेवर धारदार शस्त्राने दोन वेळा वार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत, कोणाशीही त्याचे शत्रूत्व असल्याची चर्चा नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. यासोबतच आजूबाजूच्या लोकांकडून घटनेची माहितीही गोळा केली जात आहे. त्याच्या ओळखीच्या कोणीतरी त्याची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

बुलडाण्यात डोंगर पायथ्याशी तरुणाचा मृतदेह

दरम्यान, बुलडाण्यात डोंगराच्या पायथ्याशी एका तरुणाचा मृतदेह काही दिवसांपूर्वी संशयास्पदरित्या आढळला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील गारडगाव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

संतोष टवरे (रा. एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे त्याच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डावरुन समजले होते. मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळून आल्याने ही घटना घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें