माझे कपडे काढायला लावायचा, त्यानंतर तोंड दाबून… स्वीटीचे दीपकवर गंभीर आरोप
आपला पती गे असल्याचा आरोप करणारी हरियाणाची बॉक्सर स्वीटी बुरा हिने आता नवा आरोप केला आहे. पती दीपक हुड्डा मला कपडे काढायला लावायचा आणि रात्रभर...स्वीटीच्या नव्या आरोपांनी मोठी खळबळ माजली आहे. काय आहेत तिचे आरोप ?

हिसारची माजी वर्ल्ड चँपियन, बॉक्सर स्वीटी बुरा हिने तिचा कबड्डीपटू पती दीपक हुड्डा याच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. पॅनिक अटॅकमुळे काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर जेव्हा तिला डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा स्विटी बुराने पती दीपक हुड्डा विरोधात पुन्हा नवे आरोप केले आहेत. तिच्या नव्या आरोपांमुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
माझा पती माझे कपडे उतरवायला लावायचा आणि रात्रभर मला मारहाण करायचा. उशीने माझं तोंड दाबून मला ठोसे मारायचा, असा आरोप स्वीटीने केला आहे. या सर्वा मारहाणीचे आपल्याकडे पुरावे आहेत, असंही तिन सांगितलं. माझ्या पतीने माझं घराबाहेर पडणं बंद करून टाकलं होतं. दीपक मला पाच-पाच दिवस घरात कोंडून ठेवायचा. एवढंच नव्हे तर त्याने माझी गाडी आणि माझा मोबाईलही त्याच्याच ताब्यात ठेवला होता, असाही दावा तिने केला.
यापूर्वीही स्वीटीने दीपक वर अनेक आरोप केले होते. तो गे आहे, असंही ती म्हणाली होती. माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावे,व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये तो (दीपक) मुलांशी संबंध ठेवताना दिसत आहे. हे पुरावे मी न्यायालयात सादर करेन आणि या आधारे दीपक हुड्डाकडून घटस्फोट मागणार आहे असे स्वीटी म्हणाली होती. जेव्हा मी दीपकला त्या व्हिडिओबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तो मला मारहाण करायचा. मी सगळं सहन केलं, शांत बसले. मी माज्या घरच्यांनाही या मारहाणीबद्दल एक-दोन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा त्यांनी माझं ऐकूनच घेतलं नाही. तूच (नवरा) शोधलास, आता तुझं तू पाहून घे असं म्हणत त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे मी सगळं सहन करत होते, पण आता मी काहीच अपमान, अन्याय सहन करणार नाही, असं स्वीटी म्हणाली.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
मी लव्ह मॅरेज केले होते, त्यामुळे मला सर्व काही सहन करावे लागलं,असं स्वीटी म्हणाली. 15 मार्च रोजी स्वीटी आणि दीपक हिसारच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. स्वीटी आणि दीपक हुड्डा मध्ये मारहाण झाली, त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दीपकच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात स्वीटी, तिचे वडील आणि मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, व्हिडिओची सुरुवात आणि शेवट दिसत नाही, त्यावेळी दीपक मला शिवीगाळ करत होता. व्हिडिओ एडिट करून माझ्याविरुद्ध वापरण्यात आला आहे असा दावा स्वीटीने केला. या प्रकरणात पोलिसही दीपकला सामील आहेत,असा दावाही तिने केला. यानंतरच स्वीटीला पॅनीक अटॅक आला आणि तिला हिसार येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
