AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, वीज बिल जास्त येतं म्हणून बटण बंद केलं, तेव्हा समजलं घरात सहा महिन्यापासून आहे मृतदेह

एका धक्कादायक हत्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. सहा महिन्यापासून एक कुटुंब ज्या घरात राहत होतं, त्या घरात एक मृतदेह आहे, हे त्यांना माहितच नव्हतं. अखेर वीज बिल जास्त येतं म्हणून त्यांनी एक बटण बंद केलं, तेव्हा या हत्येचा खुलासा झाला.

धक्कादायक, वीज बिल जास्त येतं म्हणून बटण बंद केलं, तेव्हा समजलं घरात सहा महिन्यापासून आहे मृतदेह
Room Image Credit source: AI Genreated Image
| Updated on: Jan 11, 2025 | 2:06 PM
Share

मध्य प्रदेश देवासमध्ये एका धक्कादायक हत्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. एका कुटुंबाला त्यांच्या घरात सहा महिन्यापासून मृतदेह आहे हे माहितच नव्हतं. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या जोडीदारानेच निर्घृण हत्या केली होती. मित्राच्या मदतीने मिळून त्याने ही हत्या केली होती. त्याचा साथीदार राजस्थानच्या तुरुंगात बंद आहे. पोलीस त्याचा रिमांड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. देवासमध्ये बायपास रोडवर वृंदावन धाम कॉलनी येथे हे घर आहे. या घराचे मालक धीरेंद्र श्रीवास्तव मागच्या सहा महिन्यांपासून दुबईत आहेत. या घराच्या उजव्या बाजूला एक रुम, किचन आणि टॉयलेट आहे. डाव्याबाजूला दोन बेडरुम आणि हॉल आहे. दोन्ही बाजू वरच्या मजल्यावर जाणाऱ्या शिड्यांनी जोडलेल्या आहेत. वरचा मजला हा श्रीवास्तव यांच्या ताब्यात आहे.

बलवीर राजपूत यांनी जुलै 2024 पासून तळमजला भाड्यावर घेतला होता. बलबीर हे दुबईत राहणारे घराचे मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांना घराच्या दुसऱ्या दोन रुम वापरण्यास परवानगी द्यावी म्हणून सतत विनंती करत होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते येथे राहतात. बलवीर राजपूत यांच्याआधी धीरेंद्र श्रीवास्तव यांनी संजय पाटीदार यांना हे घर भाड्यावर दिलं होतं. संजय यांनी जून 2024 मध्ये घर खाली केलं. पण दोन खोल्यांमध्ये काही सामान सोडलं होतं. या दरम्यान संजय इथे येऊन-जाऊन असायचा. पण तो सामान असलेल्या दोन रुम्स रिकामी करत नव्हता व भाडं सुद्धा देत नव्हता.

सकाळी सामान आपण बाहेर काढू असं त्यांनी ठरवलं

घरमालकाने बलवीर राजपूत यांना बंद असलेले ते दोन रुम उघडण्याची परवानगी दिली. गुरुवारी बलबीर यांनी टाळं तोडून त्या रुममध्ये प्रवेश केला. साफसफाई करताना फ्रीज चालू असल्याच त्यांना दिसलं. आधीचा भाडेकरु संजय पाटीदारच्या बेजबाबदारपणावर ते वैतागले. यामुळे आपल्याला जास्त लाईट बील येतं असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी फ्रीज बंद केला. सकाळी सामान आपण बाहेर काढू असं त्यांनी ठरवलं. शुक्रवारी सकाळी मात्र बंद खोलीतून अत्यंत घाण वास येऊ लागला. शेजाऱ्यांनी या बद्दल पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. फ्रीज उघडल्यानंतर त्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

हत्या का केली?

मृत महिलेच नाव पिंकी ऊर्फ प्रतिभा प्रजापती होतं. संजय पाटीदारची ती लिव्ह इन पार्टनर होती. बेडशीट गुंडाळलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. संजयने चौकशीत पोलिसांना सांगितलं की, पिंकी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. म्हणून त्याने मित्राच्या मदतीने गळा आवळून तिची हत्या केली व फ्रीजमध्ये मृतदेह ठेवला. त्याने फ्रीज सुरुच ठेवल्यामुळे या हत्येचा इतके महिने उलगडा होऊ शकला नाही.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.