AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावर रंग का टाकला ? जाब विचारल्याने मुजोर तरूणांचा भावा-बहिणीवर कोयत्याने वार

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात होळी उत्साहाने साजरी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी धुळवड, रंग खेळण्यात आले. लहान मोठे सगळेच जण रंगात माखून गेले, आनंदाने सण साजरा केला. मात्र या सणालाही मुजोर तरूणांच्या कृतीमुळे गालबोट लागलेच.

अंगावर रंग का टाकला ? जाब विचारल्याने मुजोर तरूणांचा भावा-बहिणीवर कोयत्याने वार
रंगाचा बेरंग झाला... रंग खेळण्यावरून वाद झाल्याने दोघांवर कोयत्याने वारImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Mar 17, 2025 | 7:52 AM
Share

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात होळी उत्साहाने साजरी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी धुळवड, रंग खेळण्यात आले. लहान मोठे सगळेच जण रंगात माखून गेले, आनंदाने सण साजरा केला. मात्र या सणालाही मुजोर तरूणांच्या कृतीमुळे गालबोट लागलेच. दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर काही तरूणांनी रंग टाकला. मात्र तिला ते पटले नाही. न विचारता, ओळख पाळख नसताना अंगावर रंग का टाकला ? असा जाब त्या मुलीने विचारला. मात्र त्या प्रश्नाचा भलताच राग आल्याने त्या तरूणांनी त्या मुलीच्या लहान बहिणीवर कोयत्याने सपासपवार केले. विद्येचे माहेर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये हा भयानक प्रकार घडला असून तरूणांच्या त्या टोळक्याने तिच्या लहान भावाच्या डोक्यात दगडही मारल्याने तो गंभीर जखमी झाला. यामुले प्रचंड खळबळ माजली आहे. पीडित मुलगी आणि लहान मुलावर नजीकच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते. याप्रकरणी सहा जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंगाचा बेरंग झाला, तरूणांच्या मुजोरपणामुळे दोघे जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी येरवड्यात ही धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात एका महिलेनेयेरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवड्यातील यशवंतनगर भागात राहायला आहेत. महिलेला दोन मुली असून, अकरा वर्षांचा मुलगा अशी तीन अपत्यं आहेत. धुळवडीच्या दिवशी त्यांची 17 वर्षांची मुलगी, घरासमोर असणाऱ्या किराणा माल दुकानात खरेदीसाठी गेली होती. त्या वेळी आरोपी तरूणांनी तिच्यावर अंगावर रंग टाकला. मात्र मुलीला ते बिलकूल आवडले नाही, तिने त्यांन जाब विचारला. त्यांच्यात रंग टाकण्यावरुन वादावादी झाली.

हा वाद ऐकून त्या तरूणीची लहान बहीण आणि भाऊ दोघेही त्यांच्या घरातून बाहेर आले. त्यांनीही त्या तरूणांच्या टोळक्याला जाब विचारला. मात्र वाद वाढून ते तरूण संतापले. रागाच्या भरात टोळक्यातील काही तरूणांनी त्या तरूणीच्या लहान बहिणीवर कोयत्याने सपासप वार केला. एवढंच नव्हे तर त्यांच्या 11 वर्षांच्या लहान भावाला दगडही फेकून मारला. दगड डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्या मुलांच्या आईने येरवडा पोलिसांत धाव घेत याप्रकरणी फिर्याद नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहा जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Follow Us
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पटलवार
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरू
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरून नवनाथ बनांचा ठाकरे गटाला टोला!
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या...
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण!
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार?
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार? शेतकऱ्यांनाही...