AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम करण्याची मोठी किंमत चुकवली, नाराज आई-वडिलांनी पोटच्या मुलीचाच केला घात; घरात एकटीला गाठून..

Honor Killing : बहीण तिच्या फ्लॅटमध्ये एकटी असल्याची माहिती भावाने आई-वडिलांना दिली. ती संधी साधून ते दोघेही घरी आले आणि त्यांनी मुलीला थेट...

प्रेम करण्याची मोठी किंमत चुकवली, नाराज आई-वडिलांनी पोटच्या मुलीचाच केला घात; घरात एकटीला गाठून..
| Updated on: Aug 19, 2023 | 12:43 PM
Share

गुडगांव | 19 ऑगस्ट 2023 : हरियाणातील सायबर सिटी गुडगावमध्ये ऑनर किलींगचा (honor killing) एक भयानक प्रकार समोर आला आहे. एका २२ वर्षांच्या तरूणीला तिच्याच कुटुंबियांनी केवळ या कारणास्तव संपवले, कारण तिने स्वत:च्या आयुष्याचा निर्णय स्वत:च घेत जोडीदार निवडला. तिच्याच जन्मदात्यांनी आणि भावाने (crime news) तिचं आयु्ष्य संपवलं. गुरूवारी ही धक्कादायक घटना घडली.

अंजली असे मृत तरूणीचे नाव असून तिने डिसेंबर 2022 मध्ये लव्ह मॅरेज केले होते. ती पतीसह सेक्टर-102 मधील एका सोसायटीमध्ये पतीसह राहत होती. तिचा नवरा खासगी कामासाठी बाहेर गेला असता, अंजलीचे आई-वडील तिच्या भावासह घरी आले. अतिशय थंड डोक्याने तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह घेऊन गेले व त्यावर अंत्यसंस्कारही केले.

खरंतर अंजलीचा भाऊ राहूल हा देखील तिच्यासोबत फ्लॅटमध्ये राहत होता. ज्याक्षणी तिचा नवरा तीजच्या सणासाठी त्याच्या बहिणीकडे गेला, तेव्हाच राहुलने आई-वडिलांना फोनकरून अंजली घरात एकटी असल्याचे सांगितले. हीच संधी साधून ते दोघेही गावाहून तिच्या फ्लॅटवर आले. त्यानंतर आई, बाबा आणि भाऊ या तिघांनीही अंजीलीची निर्घृणपणे हत्या केली. एवढेच नव्हे तर पुरावे मिटवण्यासाठी ते तिघेही अंजलीचा मृतदेह सोबत घेऊन गेले व त्यावर अंत्यसंस्कारही केले.

भावाचेही होते लव्ह मॅरेज

हैराण करणारी गोष्ट म्हणजे, जो भाऊ अंजवलीच्या लव्ह मॅरेजमुळे नाराज होता, त्याने स्वत:देखील प्रेमविवाहच केला होता. पण केवळ तो मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कोणीही बोट दाखवलं नाही, ना त्याला काही प्रश्न विचारले. पण अंजलीला तिच्या प्रेमाची किंमत चुकवावी लागली. पोलिसानी आई-वडील आणि भाऊ या तिघांनाही अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.