बायकोच्या वाढदिवसासाठी सुट्टी घेऊन आला, पण ड्रममध्ये त्याचाच मृतदेह..
मेरठमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथे एक इसम बायकोच्या वाढदिवसासाठी खास सुट्टी घेऊन आला. सेलिब्रेशनचा त्याचा प्लान होता, पण अचानक असं काही घडलं की घरातलं आनंदाच वातावरण क्षणात शोकाकुल झालं. नक्की काय घडलं ?

मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा सौरभ पत्नीच्या वाढदिवसासाठी खास सुट्टी घेऊन आला होता, पण तो कामावर परतलाच नाही. त्याच्या मोबाईलवर कॉल आणि मेसेजसही सुरू होते, पण त्या सौरभचा कुठेच पत्ता लागला नाही. पत्नीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तो आला होता, पण त्यानंतर जे घडलं घरातलं हसर वातावरण क्षणात दु:खात बदललं. असं काय घडलं ?
मिसिंगची कप्लेंट आल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली असता, त्याच्या घरातच एका ड्रममध्ये त्याचा मृतदेह सापडला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. पोलिसांनी सर्वांची कसून चौकशी केली , तेव्हा आणखी एक धक्कादाक गोष्ट समोर आली, ते म्हणजे ज्या पत्नीसाठी तो सुट्टी घेऊन आला होता, त्याच पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला, त्याती हत्या करून मृतदेह ड्रममध्य लपवला होता. पोलिसांनी याप्रकरणी सौरभची पत्नी आणि प्रियकराला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सौरभ हा ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनगर भागात भाड्याच्या घरात पत्नी मुस्कान आणि सहा वर्षांच्या मुलीसह राहत होता. सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. तो मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता आणि फेब्रुवारीमध्ये सुट्टी घेऊन मेरठला आला होत. आपल्या पत्नीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचा त्याचा प्लान होता. मात्र याचदरम्यान त्याच्या पत्नीचे साहिल नावाच्या तरूणाशी संबंध असल्याचे समोर आले. दोघांमधील जवळीक इतकी वाढली की त्यांनी सौरभला मार्गातून दूर करण्याचा कट रचला.
हत्या करून मृतदेह ड्रममध्ये टाकला
सौरभ घरी आल्यानंतर मुस्कान आणि साहीलने मिळून त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका मोठ्या ड्रममध्ये बंद करून, वर लोखंडी झाकण ठेवून ते पूर्णपणे सिमेंटने बंद करण्यात आले होते. मात्र सौरभ बेपत्ता झाल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून मुस्कान ही त्याच्या मोबाईलवरून सौरभच्या कुटुंबीयांना मेसेज आणि कॉल करत राहिली. पण अनेक दिवस सौरभ दिसला नाही, त्यामुळे कुटुंबियांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
वडिलांनीच फोडली खुनाला वाचा
दरम्यान, या घटनेची माहिती मुस्कानच्या वडिलांना मिळाली. त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊन आपल्या मुलीचा गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ड्रिल मशीनचा वापर करून ड्रम कापून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक करून चौकशी सुरू केली.
आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक
पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना समजली असे एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले. तपास केला असता आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराने मृत पतीचा मृतदेह मोठ्या ड्रममध्ये लपवून सिमेंटने सील केल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह ताब्यात घेऊन कारवाई करण्यात येत आहे. आरोपी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक करण्यात आली आहे असे एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले .
