AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासऱ्याने माझी बायको १० लाख रुपयांना विकली; नवऱ्याने केला आरोप, त्यानंतर जे घडलं पोलिसही हादरले

मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत पळ काढला. पत्नीच्या या कृत्याची माहिती मिळताच पतीने विष घेतले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पतीने आपल्या सासऱ्यावर पत्नीच्या बाबत गंभीर आरोप केले आहेत.

सासऱ्याने माझी बायको १० लाख रुपयांना विकली; नवऱ्याने केला आरोप, त्यानंतर जे घडलं पोलिसही हादरले
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 30, 2025 | 12:15 PM
Share

ग्वालियर येथून लग्नातील फसवणुकीचा एक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने पत्नीच्या बेवफाईमुळे दु:खी होऊन विष घेतले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले, जिथे त्याची प्रकृती गंभीर आहे. पतीने सांगितले की, माझी पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. माझ्या सासऱ्याने तिला १० लाख रुपयांना विकली आहे.

हा प्रकार भितरवार परिसरातील आहे. येथील वॉर्ड क्रमांक-१ मधील बंजारा मोहल्ल्यात राहणाऱ्या एका तरुणाने विष घेतले. विष घेणाऱ्या तरुणाने सांगितले की, मी पत्नीच्या कृत्यामुळे दु:खी होऊन विष घेतले. माझ्या सासऱ्याने माझ्या पत्नीचा सौदा तिच्या प्रियकराशी केला. तिला १० लाख रुपयांना विकले. लग्न झालेले असतानाही माझी पत्नी पुन्हा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.

वाचा: ‘माझ्यासोबत एक रात्र घालव, तुला 40,000 देईन…’, सासऱ्यानेच दिली अशी ऑफर, सुनेने थेट…

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मोनू बंजारा याची पत्नी १९ जून रोजी धर्मवीर बंजारासोबत गेली. पीडित पतीने यासंदर्भात पोलिसांना सांगितले की, धर्मवीर बंजारा, त्याचा मेहुणा सुमित बंजारा आणि इतर काही लोकांनी मिळून त्याची पत्नी पळवून नेली आहे. तसेच, मंगलसूत्र, झुमके, अंगठी, बांगड्या, करधौनी आणि पायघोळ यासह सुमारे २ लाख रुपयांचे दागिने आणि १.५ लाख रुपये रोख रक्कमही तिने घेतली आहे. यामुळे दु:खी होऊन मोनूने विष घेतले, ज्यामुळे त्याची प्रकृती खालावली. भितरवार येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला ग्वालियर येथे पाठवण्यात आले आहे.

पतीसोबत राहायचे नाही

ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल असलेल्या मोनूने सासरे छत्रपाल बंजारा यांच्यावर त्याची पत्नी पळवण्यात मदत केल्याचा आरोप केला आहे. त्याचा आरोप आहे की, सासऱ्याने त्याची पत्नी १० लाख रुपयांना विकली. मोनूच्या म्हणण्यानुसार, त्याला एक दोन वर्षांचा मुलगा देखील आहे, ज्याला पत्नीने सोडून दिले आहे. पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे मोनूच्या पत्नीचा पत्ता शोधला होता. तिने सोमवारी भितरवारला परत येण्याचेही सांगितले आहे, पण तिचे म्हणणे आहे की तिला पतीसोबत राहायचे नाही.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद