इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर चक्क ‘मिळून ७ जणी’!

इचलकरंजीत पोलिसांनी महिलांच्या जुगार अड्यावर छापा टाकला (Ichalkaranji police raid on womens gambling).

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर चक्क 'मिळून ७ जणी'!
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 7:15 PM

कोल्हापूर : इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी आणि शनिवार दरम्यान मध्यरात्री मोठी कारवाई केली. इचलकरंजी नजीक जयसिंगपूर येथील संभाजीनगर परिसरात पोलिसांनी महिलांच्या जुगार अड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकूण 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे (Ichalkaranji police raid on womens gambling).

विशेष म्हणजे जुगार अड्यावर पत्ते खेळणाऱ्या सर्व महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संबंधित महिलांवर खिसे कापणे, चोरी, यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सातही महिलांवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. सदरची कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख विकास जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत जयसिंगपूर पोलिसांनी देखील सहभाग घेतला.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मीना किरण काळे (वय 40 रा. संभाजीनगर), छाया जगनू लोंढे (वय 30, रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली), हेमा धर्मेंद्र कसबेकर (वय 40 रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), सुरेखा राजू नरंदेकर (वय 40 रा. केर्ली सध्या टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), वर्षा इकबाल लोंढे (वय 35 रा. कोरोची), ज्योती नामदेव पाटील (वय 70 रा. समडोळी मळा जयसिंगपूर), बेबी दौलत शेख (वय 45 रा. संभाजीनगर झोपडपट्टी), अर्जुन कल्लाप्पा वसगडे (वय 53 रा. मंगेश्‍वर कॉलनी उचगाव) यांचा समावेश आहे (Ichalkaranji police raid on womens gambling).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

संभाजीनगर येथे एका घरात तीनपानी पत्याचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली. ही माहिती खरी की खोटी याची खातरजमा पोलिसांनी केली. त्यानंतर इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने जुगार अड्यावर छापा टाकला.

यावेळी सात महिला आणि एक पुरुष तीन पाणी पत्याचा जुगार पैशावर खेळताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी तातडीने त्यांना अटक केली. त्यानंतर पुढील तपास आणि कारवाईसाठी आरोपींना जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

संबंधित महिलांची अधिक चौकशी केली असता या महिला सराईत पिक-पॉकेटींग आणि स्नँचींग चोरीमधील रेकॉर्ड वरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.

ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक गड विभाग जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी पथकाद्वारे करण्यात आली.

हेही वाचा : सिंगापूरमध्ये प्रयोगशाळेत तयार झालेल्या मांसाच्या विक्रीला मान्यता, कशी असणार चव? 

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.