क्षुल्लक भांडणावरुन मित्राला रुममध्ये बंद केलं, जबर मारहाण, सिगारेटचे चटके आणि करंटचे झटके दिले!

मित्रांचं क्षुल्लक कारणांवरुन भांडणं झालं... वाद विकोपला गेला... नशेत असलेल्या मित्रांनी दुसऱ्या एकट्या मित्राला रुममध्ये बंद केलं. त्याला जबर मारहाण केली. तो वेदनेने ओरडायला लागल्यावर त्याच्या तोंडात कापडाचा बोळा घालून त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. (IIT Student beaten by Friend in lucknow UttarPradesh)

क्षुल्लक भांडणावरुन मित्राला रुममध्ये बंद केलं, जबर मारहाण, सिगारेटचे चटके आणि करंटचे झटके दिले!
फोटो : प्रतिकात्मक

लखनऊ :  मित्रांचं क्षुल्लक कारणांवरुन भांडणं झालं… वाद विकोपला गेला… नशेत असलेल्या मित्रांनी दुसऱ्या एकट्या मित्राला रुममध्ये बंद केलं. त्याला जबर मारहाण केली. तो वेदनेने ओरडायला लागल्यावर त्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सिगारेटचे चटके आणि करंटचे झटकेही दिले… एवढं सगळं करुन बदमाश आरोपी फरार आहेत… ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्ला लखनऊमधली… (IIT Student beaten by Friend in lucknow UttarPradesh)

सविस्तर घटना अशी की, गोंडामध्ये राहत असलेल्या मनोजकुमार दुबे यांचा मुलगा सत्यम हा लखनऊच्या ठाण्याच्या चिन्हाट परिसरात राहायला आहे. तिथे राहून सत्यम आयआयटी कोचिंग आणि परीक्षेची तयारी करतोय. सत्यमने नुकताच आयफोन विकत घेतला होता, तो रात्री उशिरा रोहित रेसिडेन्सी येथे आपल्या मित्रांकडून मोबाईल चार्जर घेण्यासाठी गेला. तिथे आकाश वर्मा, यश पांडे, साहेब खान आणि जीतू पाठक यांच्याशी त्याचं चार्जसंबंधी बोलणं सुरु होतं.

क्षुल्लक कारणावरुन वाद टोकाला

यावेळी सत्यमचा मित्रांशी वाद झाला. वादानंतर दारुच्या नशेत असलेल्या मित्रांनी सत्यमला पडकले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर जेव्हा तो वेदनेने विव्हळत होता तेव्हा बदमाश मित्रांनी त्याच्या तोंडात कपड्याचा बोळा घातला आणि नंतरही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सिगारेटचे चटके, विजेचे झटके…!

ते एवढ्यावरच थांबले नाहीत. नशेत असल्याने त्यांना आपण काय करतोय हे काहीच कळत नव्हतं. त्यांनी सत्यमला सिगारेटचे चटके दिले, नंतर विजेचे झटकेही दिले…. यादरम्यान सत्यम बेशुद्ध झाला. मित्रांनी त्याला रुममध्ये बंद करुन तिथून पळ काढला.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

जेव्हाही त्याला शुद्ध आली त्याने त्वरित पोलिसांना मारहाण झाल्याची घटना कळवली. पोलिस घटनास्थळावर येत रुममध्ये बंद असलेल्या सत्यमची सुटका केली. त्यानंतर सत्यमला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. आता पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

IIT Student beaten by Friend in lucknow UttarPradesh

हे ही वाचा :

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिस सरसावले, My Pune Safe ॲपची निर्मिती, वैशिष्टयं काय?

काकाचं मुंडकं कापून मला फोटो पाठवा, मागणी मान्य न केल्याने 15 वर्षांच्या मुलाची हत्या