काकाचं मुंडकं कापून मला फोटो पाठवा, मागणी मान्य न केल्याने 15 वर्षांच्या मुलाची हत्या

सुरजकुमार साहू याने राजचा काका मनोज पांडे याचं डोकं कापून मला मोबाईलवर फोटो पाठवा, अशी मागणी केली. अन्यथा मी तुमच्या मुलाला ठार मारेन, अशी धमकी सुरजकुमार साहू याने दिली होती. | Murder in Nagpur

काकाचं मुंडकं कापून मला फोटो पाठवा, मागणी मान्य न केल्याने 15 वर्षांच्या मुलाची हत्या

नागपूर: पूर्ववैमन्यसातून नागपूरमध्ये एका 15 वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज पांडे असे मृत बालकाचे नाव आहे. राज हा इंदिरा नगर परिसरात राहत असून तो गुरुवारी खेळण्यासाठी घराजवळील मैदानात गेला होता. त्यावेळी राजचे अपहरण करण्यात आले. (15 year old boy kidnapped and murdered in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजकुमार साहू याने राजचे अपहरण केले. त्यानंतर राजची आई गीता पांडे यांना फोन केला. त्यावेळी सुरजकुमार साहू याने राजचा काका मनोज पांडे याचं डोकं कापून मला मोबाईलवर फोटो पाठवा, अशी मागणी केली. अन्यथा मी तुमच्या मुलाला ठार मारेन, अशी धमकी सुरजकुमार साहू याने दिली होती.

यानंतर राजच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने राजचा शोध सुरु केला होता. मात्र, शुक्रवारी सुरजकुमार साहूने राजचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आता सुरजकुमार साहूला ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या:

ठाण्यात मोबाईल चोरट्यांची इतकी हिंमत? चालत्या रिक्षेतल्या महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न, निष्पाप महिलेला मृत्यू

शेतीसाठी नुकतीच विहिर खोदली, अचानक विहिरीच्या पाण्यात प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेला मृतदेह, शेतकरी जागेवरच स्तब्ध

VIDEO : एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट

भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

(15 year old boy kidnapped and murdered in Nagpur)