मोठा भाऊ लहान भावाच्या घरी आला, घरात प्रवेश करताच समोर जे दृश्य दिसलं ते पाहून त्याला धक्काच बसला !

पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्यांच्याच संसारात वाद होऊ लागला. अखेर या संशयाने त्याने पत्नीला बेदम मारहाण केली आणि नको ते घडले.

मोठा भाऊ लहान भावाच्या घरी आला, घरात प्रवेश करताच समोर जे दृश्य दिसलं ते पाहून त्याला धक्काच बसला !
क्षुल्लक कारणातून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 11:28 PM

चित्तोडगड : चारित्र्यावरील संशयातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चित्तोडगडमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी ती फरार झाला आहे. आरोपी घटा राणीच्या जंगलात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत त्याला जंगलातून अटक केली आहे. मुकेश असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीच्या भावाच्या तक्रारीवरुन कनेरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

मुकेशला पत्नी योगिताच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून तो तिला मारहाण करायचा. बुधवारी रात्रीही नेहमीप्रमाणे त्यांच्यात वाद झाला. मुकेशला योगिताला बेदम मारहाण केली. मुकेशचा भाऊ बालकिशनला याला भावाने वहिनीला मारहाण केल्याची माहिती मिळाली. यानंतर बालकिशन तात्काळ मुकेशच्या घरी गेला. घरी पोहचताच त्याने पाहिले तर योगिताचा मृतदेह रुममध्ये पडला होता. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या.

जंगलातून आरोपीला अटक

बालकिशनने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला. आरोपी घाटा राणी जंगलात लपून बसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जंगलाच सर्च ऑपरेशन राबवत आरोपीला अटक केली. आरोपीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.