AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Crime | गोंदियात आरपीएफ पोलिसांची मोठी कारवाई, चालत्या ट्रेनमधून तब्बल 5.540 किलो गांजा पकडला!

गाडी क्रमांक 22974 पुरी-गांधी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक डी 2 मध्ये गांजा आढळल्याने मोठी खळबळ उडाली. तपासादरम्यान 1 राखडी रंगाची बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. या बॅगची तपासणी करण्यात आली तेंव्हा यामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी गाडीतील इतरही प्रवाशांच्या बॅग चेक केला.

Gondia Crime | गोंदियात आरपीएफ पोलिसांची मोठी कारवाई, चालत्या ट्रेनमधून तब्बल 5.540 किलो गांजा पकडला!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 04, 2022 | 2:04 PM
Share

गोंदिया : गोंदिया आरपीएफ पोलिसांनी (Police) रेल्वेमधून 5.540 किलो गांजा जप्त केला आहे. गोंदिया आरपीएफ पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन नार्कोस अंतर्गत गाडी क्रमांक 22974 पुरी-गांधी एक्सप्रेसच्या (Express) कोच क्रमांक डी 2 मध्ये तपासणी केली असता एका बेवारस बॅगमध्ये तब्बल 5.540 किलो गांजा आढळून आला. यानंतर पोलिसांनी डी 2 मध्ये अधिक तपासणी (Check) करत प्रवाश्यांना बॅगबद्दल विचारपुस केली. मात्र, पोलिस चेकींग करत असल्याचे आरोपीला समजल्याने त्याने बॅग गाडीमध्ये ठेवतच पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.

पुरी-गांधी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक डी 2 गांजा आढळला

गाडी क्रमांक 22974 पुरी-गांधी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक डी 2 मध्ये गांजा आढळल्याने मोठी खळबळ उडाली. तपासादरम्यान 1 राखडी रंगाची बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. या बॅगची तपासणी करण्यात आली तेंव्हा यामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी गाडीतील इतरही प्रवाशांच्या बॅग चेक केला. ही बॅग नेमकी कोणाची, गाडीत नेमकी कशी आणि कोणी आणली याबद्दल पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

आरपीएफ पोलिसांनी मोठी कारवाई

पुरी-गांधी एक्सप्रेसमध्ये 5.540 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी बॅग चेक केली असता बॅगमधून तीव्र वासासह गांज्यासारखे अमली पदार्थ असल्याचे आढळून आले. त्याचे वजन 5.540 किलो असून त्याची किंमत 55 हजार 540 रुपये आहे. आरपीएफ पोलिसांनी हा गांजा जप्त करत गोंदिया रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. यानुसार अज्ञाताविरुद्ध कलम 8 (C), 20 (B) (ii) NDPS अंतर्गत गुन्हा क्रमांक 0061/2022 दाखल करण्यात आला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार