AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कचोरी’ आणि ‘चॉकलेट’ने तरुणाला भररस्त्यात बदडले; मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

तक्रारदार विकीने कचोरीला 10 हजार रुपये उसने दिले होते, त्यापैकी पाच हजार रुपये त्याने परत केले होते आणि उरलेले पाच हजार रुपये मागितले. याचा राग मनात धरून कचोरीने चॉकलेटला बोलावून दोघांनी विकीला बेदम मारहाण केली.

'कचोरी' आणि 'चॉकलेट'ने तरुणाला भररस्त्यात बदडले; मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
पैशाच्या वादातून तरुणाला चोपलेImage Credit source: TV9
| Updated on: Feb 14, 2023 | 5:23 PM
Share

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर शहरातील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. उसने दिलेल्या पैशांच्या मुद्द्यावर एका तरुणाला दोन युवकांनी भररस्त्यात गाठून पट्ट्याने बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोन युवकांची नावे ‘कचोरी’ आणि ‘चॉकलेट’ अशी आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ भररस्त्यातील तुफान मारहाणीसह नावांमुळे अधिक चर्चेत आला आहे. तक्रारदार विकीने कचोरीला 10 हजार रुपये उसने दिले होते, त्यापैकी पाच हजार रुपये त्याने परत केले होते आणि उरलेले पाच हजार रुपये मागितले. याचा राग मनात धरून कचोरीने चॉकलेटला बोलावून दोघांनी विकीला बेदम मारहाण केली.

या घटनेची स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस सध्या मारहाण झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

वारंवार मागणी केली, मात्र पैसे देण्यास टाळाटाळ

तक्रारदार विकीने आपले पैसे वसूल करण्यासाठी आरोपी कचोरीकडे वारंवार तगादा लावला होता. विकी हा सध्या स्वतःच आर्थिक चणचणीचा सामना करीत आहे. त्यामुळे त्याने स्वतःची परिस्थिती ठीक नसल्याचे सांगून पैसे परत देण्यासाठी कचोरीला विनंती करीत होता.

मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारण देऊन पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होता. विकिला सोमवारी कचोरी हा रस्त्यात उभा असल्याचे दिसला. विकीने त्याला पैशांची आठवण करून दिली. त्यावर कचोरीला राग आला आणि त्याने भाऊ चॉकलेटला बोलावून घेतले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

यानंतर दोघांनी पट्ट्याने विकीची भररस्त्यात धुलाई केली. ही मारहाणीची घटना पाहून तेथे बघ्यांची गर्दी जमली होती. काही लोकांनी मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद केली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

चार वर्षांपूर्वी उसने दिले होते दहा हजार रुपये

तक्रारदार विकीने आरोपी कचोरीला चार वर्षांपूर्वी दहा हजार रुपये उसने दिले होते. कचोरी ते पैसे देण्याचे नाव काढत नव्हता. मात्र विकीने संयम राखला होता आणि सबुरीने पैसे वसूल करण्याचे ठरवले होते.

पैसे द्यायचे कर्तव्य असताना कचोरीने उलट विकिला मारहाण केली. त्यामुळे हा प्रकार भलताच चर्चेत आला आहे. विकिला झालेली मारहाण चुकीची असून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.