Latur Crime : पती चारित्र्यावर संशय घ्यायचा, मग तिने जे केलं ते ऐकून पोलीसही चक्रावले, काय घडलं नेमकं?

पतीच्या त्रासाला कंटाळली होती. मग अखेर तिने ते धक्कदायक पाऊल उचललं. यानंतर पोलिसांकडे मात्र वेगळाच बनाव केला. पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही.

Latur Crime : पती चारित्र्यावर संशय घ्यायचा, मग तिने जे केलं ते ऐकून पोलीसही चक्रावले, काय घडलं नेमकं?
लातूरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 11:47 AM

लातूर / 24 जुलै 2023 : पती चारित्र्यावर संशय घेतो म्हणून पत्नीनेच पतीचा काटा काढल्याची धक्कदायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. पतीची हत्या करुन जमिनीसाठी नातेवाईकाने हत्या केल्याचा बनाव करत पोलिसात फिर्याद द्यायला गेली. मात्र पोलीस तपासात पत्नीचा बनाव उघड झाला. हनमंत कटारे असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नीसह चार आरोपींना अटक केली आहे. राजेंद्र विद्याधर नितळे, दत्तात्रय नागनाथ लोंढे, निर्मला पांडुरंग दयाळ, पूजा हनमंत कटारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास गातेगाव पोलीस करीत आहेत.

काय आहे प्रकरण?

पती हनमंत हा पत्नी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला सतत मारहाण करायचा. पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर पत्नीने त्याचा काटा काढण्याचा कट आखला. आई आणि अन्य दोन पुरुषांच्या मदतीने तिने पतीचा काटा काढला. यानंतर पूजा स्वतः गोतेगाव पोलीस ठाण्यात हजर होत नातेवाईकाने जमिनीच्या वादातून आपल्या पतीची हत्या केल्याचा बनाव दिला.

हे सुद्धा वाचा

इतकेच नाही तर पूजाने एका नातेवाईकाच्या नावे पतीची हत्या केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करत सदर व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी अटक आरोपी, फिर्यादी, साक्षीदार यांच्याकडे अतिशय बारकाईने, विविध मुद्द्यांवर सखोल विचारपूस केली. तेव्हा फिर्यादी, अटक आरोपी, साक्षीदार यांच्या जबाबामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे समोर आले.

‘असा’ झाला गुन्हा उघड

यानंतर फिर्यादीला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पतीच्या त्रासाला कंटाळून आपण आई आणि अन्य दोघांच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे महिलेने कबूल केले. यानंतर पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींना अटक केली आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात गातेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी ज्ञानदेव सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार संजय भोसले, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, राजेश कंचे, बंटी गायकवाड, प्रदीप चोपणे, शिरीष पाटील, वाल्मिक केंद्रे, दशरथ गिरी, रामदास नाळे, जीवन राजगीरवाड, अतुल पतंगे, संजय मोरे यांनी केली.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.