AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी विहिरीत पत्नी आणि दोन चिमुकल्याचे मृतदेह सापडले, नंतर पतीचा मृतदेह…

मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने खळबळ उडाली आहे.

आधी विहिरीत पत्नी आणि दोन चिमुकल्याचे मृतदेह सापडले, नंतर पतीचा मृतदेह...
| Updated on: Jun 13, 2026 | 9:19 PM
Share

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. एका इसमाने विहिरीत आपल्या पत्नी आणि दोन मुलांना टाकून स्वत: महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीव दिल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संतोष तुकाराम बकाल (वय ३५) यांनी महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर एका विहिरीतून त्याची पत्नी वर्षा बकाल (वय २८), मुलगी जान्हवी बकाल (वय ७) आणि मुलगा सोहम बकाल (वय ५) यांचे मृतदेह सापडले.या दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. मात्र, याला अधिकृत दुजारो मिळालेला नाही. या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर या मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे खळबळ उडाली आहे. या लहान मुलांचे हात पाठी मागे बांधून ठेवल्याचे आढळल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागे कौटुंबिक वाद आणि आत्महत्या आहे की या मागे काही घातपात आहे याचा तपास केला जात आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार