AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पुण्यातील गुंडांची खैर नाही! रेल्वे स्टेशनवर पाऊल ठेवताच…

pune railway station : पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या स्टेशनवर 160 एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

आता पुण्यातील गुंडांची खैर नाही! रेल्वे स्टेशनवर पाऊल ठेवताच...
| Updated on: Jul 27, 2026 | 8:21 AM
Share

पुण्यासहित राज्यातील गुंडाची आता खैर नाही. रेल्वे विभागाने घेतलेल्या निर्णयाने सर्व गुंड, गुन्हेगारांची डोकेदुखी वाढली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एआय आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने सुसज्ज 160 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या मदतीने स्टेशनवरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्हेगारांची ओळख पटवणे, हरविलेल्या व्यक्ती शोधणे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे. या नव्या सिस्टीममुळे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. या स्टेशनवरून जवळपास दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या स्टेशनवर कॅमेऱ्यांपैकी 19 कॅमेरे उच्च दर्जाच्या ‘4 के’ रिझोल्यूशनचे असलस्याची माहिती मिळतेय. तसेच गुन्हेगारांच्या छायाचित्रांचा डेटाबेस हा या सिस्टमशी जोडण्यात आलाय. त्यामुळे एखादा गुन्हेगार कॅमेऱ्याच्या जवळफास फिरकला, तर ‘आरपीएफ’च्या कक्षाला ऑटोमॅटिक अलर्ट मिळणार आहे.

एखादी व्यक्ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली असेल, या हरवलेल्या व्यक्तींचे फोटो या सिस्टीममध्ये अपलोड केल्यास हरवलेली व्यक्ती सिस्टीमसमोर येताच अलर्ट मिळणार आहे. या सिस्टीममुळे स्टेशनवरील एखाद्या पुलावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यासही अलर्ट मिळणार आहे. आता स्टेशनवर एकूण 235 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यातील 160 नवीन आणि 75 जुने कॅमेरे आहेत. आता पुढील सहा महिन्यात जुने कॅमेरे हटविण्यात येणार आहे.

काय आहेत एआय सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये?

पुणे रेल्वे स्थानकावर रेकॉर्डवरील पाऊल ठेवताचं त्याची माहिती लगेच सुरक्षा यंत्रणेला मिळणार आहे. सीसीटीव्ही आधारे आणि एआय कॅमेरेद्वारे माहिती पोलिसांना मिळणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वेशी संबंधित एक हजाराहून अधिक गुन्हेगारांची माहिती छायाचित्रकांसह स्थानकावरील सर्व्हरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हायटेक सुरक्षेमुळे आता गुन्हेगारांना पकडणे सोपे होणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार