AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : लुटीचा नवा फंडा, चालता बोलता वृद्धाला गंडवलं, भामट्याने हातचलाखी केली ?

करमसिंह करसन पटेल हे सकाळी 11 वाजेच्या दरम्यान तरणतलाव रोडपासून फर्नांडिस वाडीकडे जात होते. त्याच वेळी त्यांच्याजवळ दुचाकीवरुन आलेले दोघे थांबले. पटेल यांच्याशी बोलू लागले.

Crime News : लुटीचा नवा फंडा, चालता बोलता वृद्धाला गंडवलं, भामट्याने हातचलाखी केली ?
स्कूल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यूImage Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 23, 2023 | 9:55 AM
Share

नाशिक : नाशिकमधील रस्तेही सुरक्षित नाही का ? असा सवाल आता नागरिकांना पडू लागला आहे. त्याचे कारण म्हणजे भर रस्त्यात एका वृद्धाची लूट ( Nashik Crime News ) झाली आहे. यापूर्वीही मुंबई नाका परीसरात एका तरुणीची दुचाकीस्वाराने छेड काढली होती. त्यामुळे नाशिकचे रस्ते सुरक्षित नाही असे नाशिककर म्हणू लागले आहे. नुकतीच नाशिकरोडच्या फर्नांडिसवाडीकडे जाणार्या रोडवर एका वृद्धाची लूट ( Robbery ) झाली आहे. 80 वर्षीय वृद्धाची लाखों रुपयांची लूट करण्यात आली आहे. यामध्ये उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करमसिंह करसन पटेल हे सकाळी 11 वाजेच्या दरम्यान तरणतलाव रोडपासून फर्नांडिस वाडीकडे जात होते. त्याच वेळी त्यांच्याजवळ दुचाकीवरुन आलेले दोघे थांबले. पटेल यांच्याशी बोलू लागले.

त्यावेळी पटेल यांच्याशी बोलत असतांना त्यांनी पुढे चेकिंग सुरू आहे. तुमच्याकडे काही वस्तु असेल तर द्या. महागड्या वस्तु जमा करून घेतल्या जात आहे असं सांगितलं. आणि तुमच्याकडे असलेले दागिने रुमालात टाका म्हणून सांगितले.

करमसिंह करसन पटेल या 80 वर्षीय वृद्धाने दोघांवर विश्वास ठेवला आणि लागलीच आपल्याकडे असलेले सोने आणि इतर महागड्या वस्तु त्यांच्या हातातील रुमालात टाकल्या. त्यांनी रुमाल बांधत असतांना हातचलाखीने वस्तु काढून घेतल्या.

वृद्ध व्यक्ती पुढे गेल्यावर रुमाल उघडून पाहतात तर काय रूमालात दागिने नव्हते. त्यामुळे आपली लूट झाली हे लक्षात येताच पटेल यांनी परिसरातील नागरिकांनी सांगू लागले. पोलिसांना फोन करून कळविण्यात आले होते.

घटनास्थळी पोलीस आले त्यांनी पाहणी केली आहे. पटेल यांच्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण एक लाख 37 हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाली आहे.

चेकिंग सुरू असल्याची बतावणी करत लूट झाल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यामध्ये उपनगर पोलीस तपास करत आहे.

भर दिवसा ही लुटीची घटना घडल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली असून रस्त्याने फिरतांना कुणी थांबविले आणि काही बतावणी केली तर त्यापासून सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यापूर्वी अशा विविध ठिकाणी लुटीच्या घटना घडल्या आहेत.

मात्र, आता वृद्ध व्यक्तींना पाहून लक्ष केले जात असल्याने पोलिसांसमोर ही गुन्हेगारीची पद्धत एक आव्हान निर्माण करणारी आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच