AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नालासोपाऱ्यात एक वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण, आरोपीला पकडण्यास अखेर पोलिसांना यश

मुलीला घेऊन जाताना आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. आचोळा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण करून 5 दिवसात बिहार राज्यातून पीडित मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नालासोपाऱ्यात एक वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण, आरोपीला पकडण्यास अखेर पोलिसांना यश
नालासोपाऱ्यात अपहरण झालेल्या दीड वर्षाच्या मुलीची सुटकाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 23, 2023 | 9:15 AM
Share

नालासोपारा / विजय गायकवाड : नालासोपाऱ्यातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे. अपहरण करून फरार झालेल्या माथेफिरूला पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करून सुखरुप आई वडिलांच्या ताब्यात दिले. नालासोपारा पूर्व आचोळा डोंगरी येथील राहत्या घरातून 15 फेब्रुवारी 2023 रोजी आईच्या समोरून फिरवायला नेतो म्हणून माथेफिरूने मुलीचे अपहरण करून फरार झाला होता. सुमेंद्रकुमार सुकलदास मंडल असे आरोपीचे नाव आहे.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तापासाच्या आधारे आरोपीला अटक

मुलीला घेऊन जाताना आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. आचोळा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण करून 5 दिवसात बिहार राज्यातून पीडित मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले आहे. सुमेंद्रकुमार सुकलदास मंडल असे आरोपीचे नाव असून, तो नालासोपारा परिसरात सुरक्षारक्षकाचे काम करीत होता.

ओळखीचा फायदा घेत मुलीला फिरायला घेऊन जातो सांगत अपहरण

सुरक्षारक्षकाचे काम करीत असताना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन त्याने मुलीचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पण अपहरण का केले हे मात्र स्पष्ट कारण समोर आले नाही. आचोळा पोलिसांनी त्याला अटक करून, वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी सांगितले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच