AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेला; पण, थेट रुग्णालयात पोहोचला, काय घडलं त्याच्यासोबत?

रात्री जेवण झाल्यानंतर सवयीप्रमाणे तो बाहेर फिरायला गेला. काही अंतर त्याने पार केले. अचानक पाठीमागून कुणी तरी त्याला गाठले. तो एक अल्पवयीन मुलगा होता. त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण...

फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेला; पण, थेट रुग्णालयात पोहोचला, काय घडलं त्याच्यासोबत?
CRIME NEWSImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Sep 27, 2023 | 6:34 PM
Share

उल्हासनगर : 27 सप्टेंबर 2023 | रात्रीचे जेवण झाल्यानंतर बाहेर फेरफटका मारण्याची सवय अनेकांना असते. मात्र, हीच सवय एका तरुणाच्या जीवावर बेतलीय. उल्हासनगर भागात ही घटना घडलीय. रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर फेरफटका मारण्यास बाहेर पडलेल्या तरुणावर एका अल्पवयीन मुलाने जीवघेणा हल्ला केलाय. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ माजलीय. हल्ला झालेल्या तरुणाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उल्हासनगरच्या खेमानी भागातील देशमुख नगरमध्ये ही घटना घडलीय. येथे राहणारा प्रदीप वर्मा तरुण रात्री जेवण झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेला होता. काही वेळाने त्याच्या घरच्यांना प्रदीप याच्यावर हल्ला झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असा फोन आला.

घरच्यांनी तातडीने रुग्णालय गाठले तेव्हा त्यांना धक्का बसला. प्रदीप याच्यावर कुणीतरी चाकू भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीपला काही नागरिकांनी उचलून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

प्रदीप याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. उल्हासनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली.

कुठलेही कारण नसताना प्रदीप याच्यावर अचानक हल्ला का झाला हे प्रदीपच्या आई वडिलांना समजू शकलं नाही. यामागे गुन्हेगारी प्रवृत्तीचा हात असल्याचा संशय प्रदीपच्या आईवडिलांनी व्यक्त केलाय. उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही? अशा आरोप या घटनेनंतर येथील नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, प्रदीप याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी खेमानी भागात गस्त वाढवली आहे. अल्पवयीन मुलांना हाताशी घरून त्यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे करवून घेणारी कोणती टोळी कार्यरत आहे का? त्या टोळीच्या माध्यमातून असे हल्ले करण्यात येत आहेत का या दृष्टीने पोलीस शोध घेत आहेत. तर, नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.