Mumbai Crime : ‘स्पायडरमॅन’ चोराला अखेर बेड्या ! घरात घुसण्यासाठी वापरायचा अनोखी क्लृप्ती

शिडशिडीत अंगकाठीचा वापर करून बहुमजली इमारतीवर झपाझप चढून चोरी करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. लोकांच्या घरात घुसण्यासाठी तो एक अनओखी क्लृप्ती वापरायचा आणि चोरी करून फरार व्हायचा.

Mumbai Crime : 'स्पायडरमॅन' चोराला अखेर बेड्या ! घरात घुसण्यासाठी वापरायचा अनोखी क्लृप्ती
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 4:21 PM

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : डोळ्याचं पात लवतं न लवतं तोच एका ठिकाणाहू दुसऱ्या ठिकाणी झपकन जाणारा ‘स्पायडरमॅन’ (spiderman) आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहीत असेलच. अनेकांनी त्याच्या चित्रपटाची (movie) पारायणही केली असतील. आपल्यातील सुप्त शक्तींचा वापर करत लोकांच्या मदतीसाठी धावून किंबहूना थेट उडून जाणार म्हणूया का… असा हा स्पाडयरमॅन सर्वांचाच आवडता असेल. पण तो तर सुपरहिरो झाला. प्रत्यक्षात असाच एक ‘स्पायडरमॅन’ मुंबईतही धूमाकूळ घालत होता. धूमाकूळ म्हटलं कारण तो लोकांना मदत करण्यासाठी नव्हे तर त्यांना लुटण्यासाठी (theft) फिरत होता.

शिडीशिडीत अंगकाठी आणि चपळ शरीराचा वापर करत बहुमजली इमारतींवर झपाझप चढणाऱ्या आणि चलाखीने घरातील मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या कुख्यात ‘स्पायडरमॅन’ चोराला (spiderman thief) अटक करण्यात अखेर एमआयडीसी (MIDC police) पोलिसांना यश मिळालं आहे. अनेक मजली इमारतींवर चढून घरात घुसून चोरी करणारा हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता. वैभव थोरवे असे त्या’स्पायडरमॅन’ चोराचे नाव असून पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली असून आरोपीकडून आत्तापर्यंत चोरण्यात आलेला एकूण 7.68 लाख रुपयांचा माल त्यांनी जप्त केला आहे.

कसा उघडकीस आला गुन्हा ?

11 सप्टेंबर रोजी महाकाली परिसरातील एका रहिवाशाने त्याचा लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. मूळचा सुभाष नगर येथे राहणाऱ्या या आरोपीचा चेहरा एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि त्यामुळेच त्याची ओळख पटवता आली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपी थोरवे याला अटक केली. तसेच 7.68 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्ह्याची कार्यपद्धती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवेचा बांधा अतिशय सडपातळ आहे. त्याच्या सडसडीत अंगकाठीमुळे आणि चपळतेमुळेच कोणत्याही इमारतीचा ड्रेनपाईप किंवा गॅस पाईपलाइनचा वापर करून पटापट वर चढणे त्याला शक्य व्हायचे. एखाद्या इमारतीवर चढून बाथरूमची काच काढून तो घरात घुसायचा. त्यानंतर पटापच घरातील मौल्यवान वस्तू लुटून चपळतेने तो मुख्य दरवाजातून बाहेर पडून फरार व्हायचा. ही त्याची मोडस ऑपरेंडी होती, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी थोरवे याने एमआयडीसी परिसरात लॅपटॉप तर चोरलेच. पण मेघवाडी येथील काही घरांमधून त्याने महागडे मोबाईल तसेच कॅमेरेहीलंपास केले होते. वांद्रा येथए जाऊन चोरीच्या सर्व वस्तू आणि कॅमेरा विकून पैसे कमावण्याचा त्याचा उद्देश होता. अखेर पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.