AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून दुर्गंधी येत होती म्हणून पोलिसांना बोलावले, दार उघडताच समोरील दृश्य पाहून सर्व हैराण झाले !

फेसबुकवरील मित्रासोबत प्रेमसंबंध ठेवणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. प्रेमसंबंधातून तरुणीसोबत जे घडले ते अत्यंत भयंकर होते.

घरातून दुर्गंधी येत होती म्हणून पोलिसांना बोलावले, दार उघडताच समोरील दृश्य पाहून सर्व हैराण झाले !
यवतमाळमध्ये चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीला संपवलेImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: May 31, 2023 | 9:51 AM
Share

यवतमाळ : प्रेयसी आपल्याला धोका देत असल्याची समज करत प्रियकरानेच तिची हत्या केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील जैन ले-आउट परिसरात सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आणि 24 तासाच्या आत प्रकरणचाा छडा लावला. या हत्येप्रकरणी तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया रेवानंद बागेसर ऊर्फ आरोही वानखेडे असे मयत तरुणीचे नाव आहे. तर विनोद रंगराव शितोळे असे आरोपीचे नाव असून, त्याला हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी वसमत येथून अटक केली आहे.

वणी येथे भाड्याने राहत होती तरुणी

मृत प्रिया ही मूळची वरोरा येथील रहिवासी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती वणीतील जैन ले-आउटमधील कृष्णा अपार्टमेन्टमधील पहिल्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये किरायाने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची माहिती फ्लॅटचे मालक राकेश डुबे यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच, पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.

फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर घटना उघडकीस

फ्लॅटच्या दरवाजा बाहेरून बंद होता. दार उघडून आत बघितले असता, प्रियाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत जमिनीवर पडून होता. तिच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. ही हत्या असल्याची शंका पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास सुरू केला. तपासात विनोद नामक तरुणाशी प्रियाचे प्रेमसंबंध होते आणि त्यानेच तिचा खून करून तो गावाकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम आरोपीच्या शोधार्थ निघाली. त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करीत आरोपी प्रियकर विनोद शितोळे याला हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी गावातून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दोघांची फेसबुकवरुन झाली होती मैत्री

मृत प्रिया आणि विनोद या दोघांची मैत्री फेसबुकवरून झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तो तिला भेटण्यासाठी नेहमीच वणीत येत असे. विनोद स्वभावाने संशयी होता. प्रियाचे अन्य कुणाशी प्रेमसंबंध असल्याची त्याला शंका होती. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात विनोदने प्रियाची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा