कोलकातामधील रियल इस्टेट कंपनीवर आयकर विभागाचा छापा; 200 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा संशय

आयकर विभागाने कोलकाता स्थित एका कंपनीच्या समूहावर छापे टाकले आहेत. या छाप्यामधून जवळपास 200 कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेची माहिती समोर आली आहे.

कोलकातामधील रियल इस्टेट कंपनीवर आयकर विभागाचा छापा; 200 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा संशय
आयकर विभाग
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 11:45 PM

नवी दिल्ली : आयकर विभागाने कोलकाता स्थित एका कंपनीच्या समूहावर छापे टाकले आहेत. या छाप्यामधून जवळपास 200 कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेची माहिती समोर आली आहे. याबाबत आयकर विभागाकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, संबंधित कंपनी सिमेंट आणि रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या  कोलकाता, मेघालय आणि दिल्लीमध्ये असलेल्या कार्यालयांवर छापा टाकण्यात आला.

‘अशा’ पद्धतीने जमा केली मालमत्ता

दरम्यान या छाप्यामध्ये कंपनीने  तब्बल 200 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची माहिती आयकर विभागाच्या हाती लागली आहे. उत्पन्न कमी दाखवने, एखादी वस्तू  जास्त किमतीला विकून कमी दराचे बिल तयार करणे, विकलेल्या वस्तुंच्या दरामध्ये तफावत आढळणे, कच्च्या मालाची खरेदी कमी किमतीमध्ये करून ती जादा दराने केल्याचे भासवणे अशा विविध पद्धतीने संबंधित कंपनीने 200 कोटी रुपयांची मालमत्ता जमा केल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

बनावट कंपन्यांच्या मदतीने आयकर चोरी 

दरम्यान आयकर बुडवण्यासाठी संबंधित कंपनी समूह अनेक कंपन्या चालवत असल्याचे भासवत होती. यातील बऱ्याच  कंपन्याचे अस्तित्व केवळ कागदापूरतेच मर्यादीत आहे. खोट्या कंपन्याची नोंद दाखवून संबंधित कंपनीने कोट्यावधी रुपयांचा आयकर बुडवल्याचा आरोप देखील आयकर विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

‘निवडणुकीत हरवा, भाजपची जिरवा’, काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांची मोदींच्या घोषणेवर बोचरी टीका

Kisan Andolan News: हुकूमशहा राज्यकर्त्यांचं गर्वहरण झालं, सोनिया गांधींची मोदींवर सडकून टीका

VIDEO: पत्नीच्या विरोधातील अपशब्द ऐकून चंद्राबाबू व्यथित, भर पत्रकार परिषदेत ढसढसा रडले

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.