इक्बाल मिर्चीचं आयएसआयशी कनेक्शन?; आयपीएस अधिकाऱ्याचा बदला घेणार होता?

ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआशी कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. (Iqbal Mirchi's isi connection, he wanted to harm IPS ex-officer: Enforcement Directorate)

इक्बाल मिर्चीचं आयएसआयशी कनेक्शन?; आयपीएस अधिकाऱ्याचा बदला घेणार होता?
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 10:59 PM

मुंबई: ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआशी कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याचा सूड घेण्याच्या तयारीत इक्बाल मिर्ची होता. या अधिकाऱ्याविरोधात त्याने षडयंत्रही रचले होते, अशी धक्कादायक माहिती ईडीच्या तपासात उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Iqbal Mirchi’s isi connection, he wanted to harm IPS ex-officer: Enforcement Directorate)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआयशी कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. इक्बाल मिर्ची हा आयपीएस अधिकारी राहुल सूर यांचा बदला घेण्याच्या तयारीत होता. सूर यांनी इक्बाल मिर्चीच्या गँगवर अनेक कारवाया केल्या होत्या. यामुळे मिर्चीला भारत सोडून जावं लागलं होतं. त्यामुळे मिर्ची सूर यांच्यावर डुख धरून होता. सूर हे परदेशात डेप्युटेनशनवर गेल्यावर त्याने सूर यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला होता. त्यासाठी त्याने पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयची मदतही घेतली होती, अशी धक्कादायक माहिती ईडीच्या तपासात उघड झाली आहे.

ईडीकडून आरोपपत्रं दाखल

या प्रकरणात ईडीने नुकतंच एक आरोपपत्रं दाखल केलं आहे. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद व आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या आरोपपत्रातून ही बाब उजेडात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

इक्बाल मिर्चीची प्रचंड माया

दरम्यान, ऑक्टोबर 2020मध्ये ईडीने इक्बाल मिर्चीच्या घरावर कारवाई केली होती. यावेळी ईडीने त्याची प्रचंड संपत्ती जप्त केली होती. ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीत एक सिनेमागृह, हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीतील 3.5 एकरच्या जमिनीचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीची 776 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यात 203 कोटींच्या विदेशातील संपत्तीचाही समावेश होता. त्यामुळे आता इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 798 कोटीची जप्त झाली होती. ईडीने 26 सप्टेंबर 2019 रोजी इक्बाल मिर्ची आणि इतरांची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूँ मर्चंटसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयात 9 डिसेंबर 2019 रोजी एक तक्रार दाखल केली होती. त्याची कोर्टाने दखल घेतली होती. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात सहभागी असल्याप्रकरणी इक्बाल मिर्चीचे दोन्ही मुले, आसिफ मेमन, जुनैद मेम आणि पत्नी हाजरा मेमनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. (Iqbal Mirchi’s isi connection, he wanted to harm IPS ex-officer: Enforcement Directorate)

संबंधित बातम्या:

सिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त

डी-कंपनीचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या साथीदाराला अटक

गँगस्टर इक्बाल मिर्चीचे प्रफुल्ल पटेल यांच्याशी थेट संबंध?

(Iqbal Mirchi’s isi connection, he wanted to harm IPS ex-officer: Enforcement Directorate)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.