AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला मुलींमध्ये रस… कोणी केला धक्कादायक दावा ?

Sonam Raghuvanshi Kundali : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा धक्कादायक ट्विस्ट आला आहे. सोनमची कुंडली अर्थात पत्रिका जुळवणाऱ्या ज्योतिषाने अनेक खुलासे केले आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या दुसऱ्या महिलेचा लवकरच खुलासा होईल असा दावा त्यांनी केला आहे. राजाच्या कुटुंबाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.

Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला मुलींमध्ये रस... कोणी केला धक्कादायक दावा ?
सोनम रघुवंशीबद्दल धक्कादायक दावा Image Credit source: TV9 bharatvasrh
Updated on: Jun 20, 2025 | 8:25 AM
Share

इंदौरमधील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या निर्घृण हत्येप्रकरणी मेघालय न्यायालयाने गुरुवारी आरोपी पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह या दोघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.याशिवाय, आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद या तीन अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याच दरम्यान आता मृत राजा रघुवंशी यांच्या ज्योतिषाने एक अतिशय धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणतात की, सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात. जर रघुवंशी कुटुंबीयांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर, या ज्योतिषाने यापूर्वी केलेले सर्व दावे देखील खरे ठरले आहेत.

मृत राजाच्या कुटुंबियांच्या सांगण्यानुसार, ज्योतिषी अजय दुबे यांनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेली बहुतांश भाकितं खरी ठरली आहेत. राजा रघुवंशी हत्याकांडात पंडित अजय दुबे म्हणाले – राजाच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाची पत्रिका ही सोनमच्या पत्रिकेशी जुळवून पाहिली होती. त्यावेळी त्यांनी राजाच्या कुटुंबियांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली होती, त्यातील उत्तरं बऱ्या प्रमाणात बरोबर ठरली.

काय विचारले होते प्रश्न ?

राजाच्या कुटुंबियांचा प्रश्न – राजाची तर हत्या झाली, पण आमची सून सोनम कुठे आहे ?

उत्तर – सोनम जिवंत आहे आणि सुरक्षित आहे.

राजाच्या कुटुंबियांचा प्रश्न – सोनम जिवंत आहे, तर मग ती कुठे आहे ?

उत्तर – ती उत्तर दिशेला आहे.

राजाच्या कुटुंबियांचा प्रश्न – या हत्येत कोणाकोणाच सहभाग आहे ?

उत्तर – तीन ते चार लोकं आणि महिला

राजाच्या कुटुंबियांचा प्रश्न – पण ती महिला कोण आहे ?

उत्तर – तुमचीच सून सोनम

‘सोनमचे समलैंगिक संबंध’

याशिवाय, ज्योतिषी अजय दुबे यांनी असाही दावा केला की, या मर्डर मिस्ट्रीमध्ये आणखी एक महिला सामील आहे. ती दुसरी महिला कोण हे लवकरच उघड होईल, असं ते म्हणाले. ती दुसरी महिला म्हणजे सोनमची मैत्रीणही असू शकते. एवढंच नव्हे तर सोनमचे समलैंगिंक संबंध असू शकतात, तिला मुलींमध्ये रस आहे, असं तिची पत्रिका सांगत्ये, असा दावाही त्यांनी केला.

पत्रिकेत होता मृत्यूयोग

ज्योतिषी अजय दुबे म्हणाले- सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबाला फसवले आहे. पत्रिकेत मृत्युयोग होता, परंतु सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती दिली नाही. जर राजाच्या कुटुंबाला मृत्युयोगाची माहिती दिली असती तर काही उपाय करता आले असते आणि ही घटना घडली नसती. सोनमचं गेल्या 2 वर्षांपासून प्रेमप्रकरणसुरू होतं. ती अतिशय हेकेखोर आणि हट्टी मुलगी आहे. तिच्या कुंडलीत राहू योग होता, म्हणून ती तिला जे हवं तेच करायची. तिला जे पाहिजे ते साध्य करण्यासाठी, मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ सकते हे तिची पत्रिका पाहिल्यावर कळतं, असा दावाही त्यांनी केला.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.