AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीच्या हळदीत सासऱ्याचा जावयासह प्रेमविवाह करणाऱ्या मुलीवर गोळीबार, पोलिसांनी दिले महत्वाचे अपडेट

मुलीचे वडील किरण मंगले यांना तृप्ती आणि अविनाश चोपड्यात लग्नाला आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते शिरपूरवरुन चोपड्यात आले. त्यांनी लग्न समारंभातच मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात गोळीबार करणारे किरण अर्जुन मंगले यांच्यासोबत कोण आहे का? त्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले.

बहिणीच्या हळदीत सासऱ्याचा जावयासह प्रेमविवाह करणाऱ्या मुलीवर गोळीबार, पोलिसांनी दिले महत्वाचे अपडेट
घटनेबाबत महेश्वर रेड्डी यांनी महत्वाचे अपडेट दिले.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 27, 2025 | 12:29 PM
Share

जळगाव जिल्ह्यात सैराट चित्रपटाचा पुनरावृत्ती झाली. मुलीने आपल्या मनविरुद्ध प्रेम विवाह केल्याचा राग बापाच्या मनात होता. त्यामुळे दोन वर्षानंतर जावयाच्या बहिणीच्या लग्न समारंभात बापाने मुलगी आणि जावयावर गोळीबार केला. या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला आहे तर जावई गंभीर जखमी आहे. त्याला पुण्याला हलवण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्या सासऱ्याला जमावाने बेदम चोप दिला. त्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणात गोळीबार करणारे किरण अर्जुन मंगले यांच्यासोबत कोण आहे का? त्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, मुलीचे वडील किरण मंगले यांना तृप्ती आणि अविनाश चोपड्यात लग्नाला आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते शिरपूरवरुन चोपड्यात आले. त्यांनी लग्न समारंभातच मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्याकडे परवाना असलेल्या पिस्तूलमधून हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार केला त्या ठिकाणी किरण मंगले यांच्या सोबत कोणी नव्हते. परंतु इतर ठिकाणावरुन त्यांना कोणी मदत केली का? त्याचा तपास सुरु आहे. किरण अर्जुन मंगले हे सीआरपीएफमध्ये होते. ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे परवाना प्राप्त पिस्तूल होते. त्यातूनच हा गोळीबार केला. किरण मंगले यांनी तीन राउंड फायर केले होते, असे डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

काय होते प्रकरण…

दोन वर्षापूर्वी तृप्ती अविनाश वाघ (२४) हिने अविनाश ईश्वर वाघ (२८, दोधे रा.करवंद, शिरपूर) याच्याशी प्रेमविवाह केला होता. हा प्रेमविवाह तृप्तीचे वडील निवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण अर्जुन मंगले (४८, रा.शिरपूर) यांना पसंत नव्हता. शनिवारी अविनाश त्याच्या बहिणीच्या विवाह समारंभासाठी तृप्तीसोबत चोपड्यात आला. अविनाश याच्या बहिणीची हळद चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकरनगरमध्ये सुरु होती. त्यासाठी किरण मंगले आले होते. रात्री दहा वाजता त्यांनी मुलगी तृप्ती आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मुलगी तृप्ती ठार झाली. तसेच अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या अविनाशला पुढील उपचारासाठी रात्रीतून पुणे येथे हलवण्यात आले आहे.

घटनेनंतर ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत किरण अर्जुन मंगले हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून जळगावातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेतील पिस्तूल जप्त केले आहे. आता मुलीचे वडील मंगले तसेच गंभीर जखमी असलेला मुलीचा पती अविनाश उपचारात बरे झाल्यानंतरच घटनेतील अधिक माहिती मिळणार आहे. त्या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहे.

Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...