सातपुडा वनक्षेत्रात अवैध धंदा करणाऱ्या अड्ड्यावर धाड, 51 जणांच्या मुसक्या आवळल्या

दरम्यान जळगावातील कुरा काकोडा या भागात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत.(Jalgaon Raid on a illegal traders)

सातपुडा वनक्षेत्रात अवैध धंदा करणाऱ्या अड्ड्यावर धाड, 51 जणांच्या मुसक्या आवळल्या
Police Arrest Thief
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 7:01 AM

जळगाव : अवैध धंदा करणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. या धाडीत पोलिसांनी तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 51 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात ही धाड टाकण्यात आली आहे. (Jalgaon Raid on a illegal traders)

अवैध धंदाच्या अड्ड्यावर धाडी 

जळगाव जिल्ह्यातील विदर्भ खान्देश सीमेलगत असलेल्या कुरा काकोडा नजीक पिंपळा फाट्यावर अनेक अवैध धंदे चालतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या धंद्याच्या अड्ड्यावर धाड टाकली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही धाड टाकण्यात आली.

यात 6 महागड्या चार चाकी गाड्या, दहा बाईक, 51 मोबाईल आणि 2 लाख 60 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हा सर्व मुद्देमाल 35 लाखांचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी 51 जणांना ताब्यात घेतले आहे. भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आर्चित चांडक व पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने ही धाड टाकली आहे.

स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष

दरम्यान जळगावातील कुरा काकोडा या भागात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. कुरा काकोडा हा परिसर विदर्भ खान्देशच्या सीमेवर आणि सातपुडा वन क्षेत्रात आहे. त्यामुळे याठिकाणी नागमणी, जुगार, सट्टा असे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पण स्थानिक पोलीस हे कायम याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पण काल टाकलेल्या धाडसत्रामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ही आतापर्यंत करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे पोलिसांचा वचक असाच राहणार की पुन्हा थातूर मातूर कारणं देऊन पुन्हा अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे होईल हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Jalgaon Raid on a illegal traders)

संबंधित बातम्या : 

संतापजनक ! लग्नाआधी महिलेचं सात वर्ष लैंगिक शोषण, लग्नानंतरही ब्लॅकमेल करत चार वर्ष छळलं, विरोध करताच आक्षेपार्ह फोटो व्हायरल

वीजजोडणी कापल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, अंबरनाथच्या रेल्वे पोलिसाचा प्रताप

लाखोंची डील करुन पैसे बळकावले, दोन वर्ष पोलिसांना चकवा, अखेर दिल्लीत दाम्पत्याला बेड्या

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.