AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna Crime : अनैतिक संबधांची लागली कुणकुण, थेट मारून धरणात फेकलं, खुनाने अख्ख्या गावात खळबळ

जालना जिल्ह्यातील सोमठाणा येथे धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधांतून एका इसमाचा त्याच्याच लहान भावाने खून केला. मृतदेह धरणात फेकून दिला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. नेमकं काय घडलं ?

Jalna Crime : अनैतिक संबधांची लागली कुणकुण, थेट मारून धरणात फेकलं, खुनाने अख्ख्या गावात खळबळ
क्राईम न्यूजImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Nov 14, 2025 | 9:11 AM
Share

विश्वासाच्या पायावरच कोणतंही नातं उभं असतं मग ते मित्र-मैत्रीणीचं असो, भावा-बहिणीचं किंवा पती-पत्नीचा एकदा का विश्वास मोडला तर नात्याला तडा जायला क्षणभराचाही वेळ लागत नाही. प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो असं म्हणतात, पण हे प्रेम दुसऱ्यासाठी जीवघेणं ठरलं तर मग खूप पंचाईत होते आणि जीवन उद्ध्वस्त होतं. असंच काहीसं जालन्यातल्या सोमठाणा गावातही घडलं. पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरू होता, मात्र दीराच्या रुपाने त्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आणि हसता-खेळता संसार क्षणात मोडला. वहिनीशी प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधातून एका इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाची हत्या केली (crime) आणि त्या मृतदेह धरणात फेकून दिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीनेही दीराची साथ दिली आणि खुनात मदत करत मृतदेहाची विल्हेवाट लावून टाकली.

अनैतिक प्रेम संबंध मध्ये अडथळा येत असल्याने मागच्या महिन्यात 15 ऑक्टोबर रोजी डोक्यात कुऱ्हाडीने वार करून इसमाचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करून मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या गुन्ह्याची उकल केली असून बदनापूर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या भावाला आणि पत्नीला अटक केली.

नेमकं काय घडलं ?

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गावातून ही धक्कादायक घटना समोर आली. प्रेम प्रकरणामधून सख्या भावानेच आपल्या वहिनीच्या मदतीने मोठ्या भावाचा खून ( Crime News) केला. मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर राम तायडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या भावाला आणि पत्नीला अटक केली असून त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तेव्हा मृत व्यक्तीचा लहान भाऊ ज्ञानेश्वर तायडे आणि मृताची पत्नी मनीषा परमेश्वर तायडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनैतिक प्रेम संबंध असल्याच समोर आला. मात्र परमेश्वर याला हे समजलं आणि त्या दोघांच्या प्रेमसंबंधात त्याचा अडथळा येऊ लागला.

म्हणूनच दोघांनी त्याला मार्गातून हटवण्याचा कट रचला. अखेर ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी गेल्या महिन्यात 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री परमेश्वरच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याचा निर्घृण खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावून या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत भरला आणि गावालगत असलेल्या वाल्हा येथील धरणात आणून फेकला. मात्र याप्रकरणी मृत व्यक्तीच्या वडिलांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी तपास सुरू करून गुन्हा उघडकीस आणला. त्यानंतर बदनापूर पोलीस ठाण्यात पत्नी आणि लहान भावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.