AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ” दागिने-पैसे लुटणारा वसईचा भामटा अटकेत

मला ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ आहे, मी काय तुझे पैसे घेऊन कुठे पळून जाणार आहे का? तुझे पैसे देणार नाही का? अशा वेगवेगळ्या भुलथापा लावून पैसे, सोन्याचे दागिने, मोबाईल लुटणाऱ्या भामट्याचा वसईत पर्दाफाश करण्यात आला आहे.

ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ दागिने-पैसे लुटणारा वसईचा भामटा अटकेत
| Updated on: Oct 24, 2020 | 6:38 PM
Share

वसई : मला ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ आहे, मी काय तुझे पैसे घेऊन कुठे पळून जाणार आहे का? तुझे पैसे देणार नाही का? अशा वेगवेगळ्या भुलथापा लावून पैसे, सोन्याचे दागिने, मोबाईल लुटणाऱ्या भामट्याचा वसईत पर्दाफाश करण्यात आला आहे. माणिकपूर पोलिसांनी या भामट्याकडून 137 ग्रॅम सोन्याचे दागिने 6 लाख 19 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ( Jewelery thief arrested in Vasai)

वसई, विरार, नालासोपारा, मीरा-भाईंदर परिसरात गुन्हे करून फरार असलेला विजय दत्ताराम तांबे (वय52) या भामट्याला वसई माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. वसई पोलीस ठाण्यात 2015 साली या भामट्यावर अगोदरच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हात 1 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा देखील याने भोगली होती. पालघर, ठाणे, रायगड, मुंबई यासह अन्य परिसरातील पोलीस ठाण्यात याच्या विरोधात 19 च्या वर गुन्हे दाखल आहेत. हा भामटा सध्या रायगड जिल्ह्यातील तळोजा फेज 2, सेक्टर 19, प्लॅट न 16, एक्झॉटिका सोसायटी मधील 806 एल.के मधील रहिवाशी आहे. हा मूळचा भिवंडीतील जाधवनगर शेलारगावचा रहिवाशी आहे. सीसीटीव्हीच्या आधारे माणिकपूर पोलिसांनी या सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळाले आहे. पोलीस तपासात या भामट्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संबंधित बातम्या :

लग्नास नकार दिल्यानं तरुणीला मारहाण, कल्याण पोलिसांनी प्रियकराला 2 तासात ठोकल्या बेड्या

Phone Pe आणि PayTm च्या मदतीने फसवणूक, चोरलेले 6 लाख 46 हजार रुपये पोलिसांनी परत मिळवले

( Jewelery thief arrested in Vasai)

Follow Us
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?