AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan : प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो, सांगत महिलेची अडीच लाखाची फसवणूक

'आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो',असे सांगून एका 56 वर्षीय महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन भामट्यांनी या महिलेला फसवले. प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Kalyan : प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो, सांगत महिलेची अडीच लाखाची फसवणूक
| Updated on: Jan 20, 2024 | 11:21 AM
Share

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 20 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी उत्साहात सर्वत्र तयारी सुरू असून देशभरातील अनेक नामवंत नागरिक या सोहळ्यासाठी येणार आहेत. या निमित्त विविध राज्यांत सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. या सोहळ्याला आता अवघे काहीच दिवस उरले असून देशभर भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील नागरिक या सोहळ्यासाठी उत्सूक आहेत.

मात्र नागरिकांच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. ‘आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो’,असे सांगून एका 56 वर्षीय महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन भामट्यांनी या महिलेला फसवत तिच्याकडील अडीच लाखाचा ऐवज लंपास करत धूम ठोकली. याप्रकरणी कल्याणमधील महात्मा फुले पोलीसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

अशी केली फसवणूक

कल्याण पश्चिम येथील खडकपाडा भागातील लोटस डेंटल केअर सेंटरसमोर त्याच भागात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेच्या बाबतीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून पायी चालली होती. यावेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही राम भक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो, असे त्यांनी त्या महिलेला सांगितलं. त्यासाठी तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, इतर सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा, असेही भामट्यांनी तिला सुचवलं.

त्या महिलेने त्या तीन भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवाला आणि तिच्याकडील जवळपास 2 लाख 66 हजाराचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळला. हा ऐवज कुणी चोरू नये म्हणून भामट्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला. आपणास रामाचे दर्शन होत आहे या आनंदात ती महिला होती. तेवढ्यात तिन्ही भामट्यांनी संधी साधली आणि त्या महिलेला एकाकी सोडून तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले आणि ती हादरली. मात्र तिने कसाबसा धीर एकवटला आणि खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तेथे सर्व प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी फौजदार तानाजी वाघ आणि त्यांचे सहकारी तिघा फरार भामट्यांचा शोध घेत आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच