AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरहून येऊन टिटवाळात सशस्त्र दरोडा, सीसीटीव्हीने दरोडेकोरांचा सुगावा, 10 पैकी 3 अटकेत

टिटवाळ्यात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या एका टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे दरोडेखोर अहमदनगरहून टिटवाळ्यात दरोडा टाकण्यासाठी आले होते.

नगरहून येऊन टिटवाळात सशस्त्र दरोडा, सीसीटीव्हीने दरोडेकोरांचा सुगावा, 10 पैकी 3 अटकेत
| Updated on: Mar 25, 2021 | 11:58 PM
Share

कल्याण : टिटवाळ्यात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या एका टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे दरोडेखोर अहमदनगरहून टिटवाळ्यात दरोडा टाकण्यासाठी आले होते. यानंतर ते लूटपाट करुन नगररला परतलेही. मात्र, सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा सुगावा लागला. कल्याण तालुका पोलिसांना 10 पैकी 3 आरोपींना अटक करण्यात यश आलं. इतर आरोपी फरार आहेत (Kalyan Police arrest three robber who came from Ahmednagar for crime in titvala).

कल्याण तालुक्यातील पावशेपाडा आणि काही भागात 20 मार्चच्या पहाटे काही दरोडेखोर आले. त्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. काही घरात घूसून लोकांच्या वस्तू लूटल्या आणि फरार झाले. यानंतर या दरोडेखोरांचा दरोडा टाकतानाचं सीसीटीव्ही फुटेज चांगलंच व्हायरल झालं. टिटवाळ्यात अशाप्रकारे दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे टिटवाळा पोलिसांसमोर दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान होतं.

तांत्रिक माहितीच्या आधारे तपास, तिघांना अटक

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एलसीबी आणि टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांनी यासाठी तपास पथके तयार केली आणि तपास सुरु झाला. अखेर या प्रकरणात 3 दरोडेखोरांना अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संतोष दराडे म्हणाले, “तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु होता. अखेर या प्रकरणी 10 ते 12 दरोडेखोरांपकी 3 दरोडेखोर अक्षय गायकवाड, किरण जांभळकर आणि अनिल पवार या तिघांना अटक करण्यात आली.”

इतर आरोपींचा शोध सुरु आहे. नगरमधील पारनेरहून हे दरोडेखोर बोलेरो गाडीत बसून टिटवाळ्यात आले होते. जवळपास 4 लाखाचा ऐवज लूटन ते पसार झाले. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र या प्रकरणात अजून 7 ते 9 आरोपी फरार आहेत. त्यामुळे पोलीस कॅमेऱ्यावर काही बोलायला तयार नाहीत.

हेही वाचा :

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सराईत गुन्हेगारांचा अड्डा, घरफोड्यांचे 30 गुन्हे दाखल असणाऱ्यांना बेड्या

चॉपरने मारहाण करुन लुटायचे, वांद्रे आणि खार पोलिसांकडून तिघांना अटक

सोलापुरात चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूट, यशवंतपूर-अहमदाबाद ट्रेनमधून 50 पेक्षा जास्त तोळे सोनं लंपास

व्हिडीओ पाहा :

Kalyan Police arrest three robber who came from Ahmednagar for crime in titvala

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.