Car theft news : गाडी चालवता येत नव्हती पण तिघांनी चोरली, गाडी ते 10 किमी पर्यंत घेऊन गेले, कसं?

Car theft news : या चोरांनी जे केलं, ते वाचल्यानंतर तुम्ही डोक्यावर हात माराल. महत्वाच म्हणजे तिघेही उच्च शिक्षण घेत आहेत. एक इंजिनियरींगला आहे.

Car theft news : गाडी चालवता येत नव्हती पण तिघांनी चोरली, गाडी ते 10 किमी पर्यंत घेऊन गेले, कसं?
car Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 3:18 PM

लखनऊ : आपण वाहन चोरीचे वेगवेगळे किस्से ऐकत असतो. त्यात चोर नवनव्या कृलप्त्या करुन चोरी करत असतात. अनेक प्रकरणात चोर स्वतःच गाडी चालवत नेतो, पण या प्रकरणात एकाही चोराला गाडी चालवता येत नव्हती. या बहाद्दरांनी चक्क 10 किलोमीटर गाडी ढकलत नेली. एका निर्जन स्थळी गाडी नेवून लपवली. गाडीची नंबर प्लेट काढून गाडी विकण्याची तयारीही केली. यासाठी त्या चोरांनी वेबसाईट बनवून चोरीच्या गाड्या विकण्याची योजना आखली होती. मात्र त्यांना यश आलं नाही.

पोलिसांनी त्यांचा हा मनसुबा पूर्ण होण्याआधीच अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं सत्यम कुमार, अमन गौतम आणि अमित वर्मा असे आहेत. यांच्यापैकी एकालाही गाडी चालवता येत नव्हती. तरी त्यांनी गाडी चोरण्याचे धाडस केले.

वॅन चोरुन 10 किलोमीटर धक्के मारत नेलं

मध्यरात्रीच्या सुमारास सत्यम कुमार, अमन गौतम आणि अमित वर्मा यांनी कानपूरच्या नजीराबाद भागातून मारुति वॅन चोरी करुन 10 किलोमीटर धक्के मारत एका ठिकाणी लपवली. यानंतर नजीराबाद पोलिसांनी केलेल्या तपासात या तिघांना अटक करण्यात आली. नजीराबादचे एस.पी नारायण सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार हे तिघे तरुण गाडी चोरुन विकायचे, जर गाडी विकली गेली नाही तर ती भंगारात देवून टाकायचे.

चोरी करणारे उच्चशिक्षित तरुण

मारुति वॅन चोरणारे हे तरुण उच्चशिक्षित असून उत्तर प्रदेशच्या कानपूरच्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकतात. अटक झालेल्या तरुणांपैकी सत्यम कुमार हा महाराजपूरच्या एका इंजीनियरिंग कॉलेजमध्ये बीटेक करतो आहे. अमन गौतम बीकॉम करतो आहे, तर अमित वर्मा एका कन्ट्रक्शन साईटवर इंजीनियर आहे.

अशी झाली अटक

मारुति वॅन 10 किलोमीटर नेल्यानंतर ती एका निर्जन स्थळी लपवून ठेवण्यात आली. ते चोरीचे वाहन विकण्यासाठी एक वेबसाईट तयार करणार होते. जर या गाड्या विकल्या गेल्या नसत्या तर त्या भंगारात देवून काही पैशे मिळवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सीसीटीव्हीच्या मदतीने या चोरांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आलं. तपासात आणखी काही खुलासे

पोलिसांनी केलेल्या तपासात त्या तिघांनी आणखी काही गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्यांच्या कडून चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. चोरीचा प्लॅन अमित वर्माने बनवला असल्याचे तपासात समोर आले. पोलीस त्यांचा तपास करत असून आणखी कोणत्या गुन्हात ते सहभागी होते का? याची माहिती घेत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.