पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गेल्या आठवड्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रजतने आपल्याला न्यू बेल रोडवरील एका हॉटेलच्या रुममध्ये भेटायला बोलावलं होतं, असा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे.
डिनरनंतर मी रजतसोबत त्याच्या रुमवर गेले. त्यावेळी तिथे त्याचे आणखी तीन मित्र आधीपासूनच बसले होते. त्यानंतर चौघांनी माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला, असा आरोपी पीडित नर्सने केला आहे.
संजयनगर पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्काराच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. रजत, शिव राणा, योगेश कुमार आणि देव सरोही अशी आरोपींची नावं आहेत. चौघंही विशीच्या आसपासचे आहेत.
रजत आणि शिव राणा तीन महिन्यांपूर्वीच बंगळुरुला आले होते. ते एका भाड्याच्या घरात राहतात. तर देव आणि योगेश गेल्याच आठवड्यात तिथे पोहोचले. स्विमिंगच्या ट्रेनिंगसाठी सगळे जण बंगळुरुला गेले होते. चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप
पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप