AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजानच्यावेळी हनुमान चालीसा लावली म्हणून दुकानदाराला बेदम मारहाण, भाजपाने म्हटलं ‘हिंदुंना खुलेआम….’

Hanuman Chalisa | आरोपींनी आधी दुकानदार मुकेशला मारहाण केली. एवढ्यात दुसऱ्या एका आरोपीने मुकेशवर चाकू हल्ला करुन त्याला जखमी केलं. ही सर्व घटना दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. पीडिताच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवलय.

अजानच्यावेळी हनुमान चालीसा लावली म्हणून दुकानदाराला बेदम मारहाण, भाजपाने म्हटलं 'हिंदुंना खुलेआम....'
Crime
| Updated on: Mar 18, 2024 | 2:14 PM
Share

बंगळुरु : एका दुकानदाराला मारहाण झाल्याच प्रकरण समोर आलय. काही जणांनी मिळून दुकानदाराला मारहाण केली. दुकानात भक्ती गीत सुरु होतं, असं पीडीत व्यक्तीचा आरोप आहे. हे भक्ती गीत बंद करण्यासाठी काही लोक आले व त्यांनी मारहाण केली. या जखमी दुकानदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवलाय. बंगळुरुच्या नगरथपेटेमध्ये ही घटना घडली.

दुकानदाराच म्हणण असं आहे की, त्याच्या दुकानात हनुमान चालीसा सुरु होती. त्यावेळी सहा लोक तिथे आले. अजानची वेळ असल्याच सांगून हनुमान चालीसा बंद करायला सांगितली. त्यावरुन दुकानदार आणि युवकांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. आरोपी युवकांनी दुकानदाराला मारहाण केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

कसलं दुकान होतं?

स्थानिक दुकानदारांनी बराच विरोध केल्यानंतर बंगळुरुच्या हलासुरू गेट पीएस पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. पोलिसांनी सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश आणि तरुण विरोधात गुन्हा नोंदवलाय. पीडित व्यक्तीच मुकेश नगरथपेटेमध्ये मोबाइलच दुकान आहे. त्याच्या शेजारीच प्रार्थना केंद्र आहे. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आरोपी तिथे आले. त्यांनी भक्ती गीत बंद करायला सांगितलं. त्यावरुन वाद झाला. आरोपी युवकांनी दुकानदाराला मारहाण केली. त्यात तो जखमी झाला.

‘खुलेआम हिंदुंना धमकावल जातय’

या घटनेवर भाजपा कर्नाटकने ‘X’ वर पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिलीय. BJP ने लिहिलय की, “कर्नाटकला काँग्रेसच्या तुष्टिकरणाच्या राजकारणाची किंमत चुकवावी लागतेय. कट्टरपंथी अतिवादी तत्वांनी रस्त्यावर कब्जा केलाय. खुलेआम हिंदुंना धमकावल जातय. जेव्हापासून काँग्रेस सत्तेत आलीय, तेव्हापासून कर्नाटकमध्ये धर्मतंत्र हावी झालय”

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.