काकाच्या डोळ्यांनी काकीच नको ते रुप पाहिलं, लहानच मोठं केलं तोच ठरला दु:खाच कारण
परस्परांपासून लांब राहणं काकीला आणि त्याला सहन होत नव्हतं. काकीला भेटण्याची आस लागलेली. घरात भांडणं सुरु झाली. विषय पोलीस स्टेशनपर्यंत गेला. तिथे तोडगा निघाला. पण...

दोघांच परस्परावर प्रेम होतं. पण त्या प्रेमाला समाजाच्या नजरेत मान्यता नव्हती. कशी असेल मान्यता? कारण प्रेयसी आधीपासून विवाहित होती. ज्याच्यावर ती प्रेम करायची, नात्यात तो तिचा पुतण्या लागायचा. समाज, नात्याची पर्वा न करता त्यांचं अफेअर सुरु होतं. पुढे जाऊन या प्रेमाच काय होणार? याचा त्यांनी विचार केला नव्हता. दोन वर्षानंतर एक दिवस नवऱ्याने पत्नीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडलं. त्यावेळी इतका वाद झाला की, दोघांच्या भेटण्यावर बंधन आली.
परस्परांपासून लांब राहणं काकीला आणि पुतण्याला दोघांना सहन होत नव्हतं. पुतण्याला काकीला भेटण्याची आस लागलेली. घरात भांडणं सुरु झाली. विषय पोलीस स्टेशनपर्यंत गेला. तिथे तोडगा निघाला. पण काकीने विष प्राशन करुन जीवन संपवलं. पुतण्याला या बद्दल समजलं, तेव्हा त्याने सुद्धा काकी सोडून गेली म्हणून विष प्राशन केलं. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केला. तिथे त्याचा जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरु आहे.
अफेअर कसं सुरु झालं?
मंझनपुर कोतवाली क्षेत्र हटवा रामपूरच प्रकरण आहे. इथे 36 वर्षीय पिंटूच लग्न विमला देवीसोबत झालेलं. त्यांनी तीन मुलं झाली. दोन वर्षापूर्वी पिंटूच्या 20 वर्षीय पुतण्या विशोकसोबत विमला देवीची जवळीक वाढली. पिंटू दुसऱ्या शहरात काम करायचा. तो फार कमी घरी यायचा. विमला आणि विशोक परस्परासोबत वेळ घालवू लागले.
दोघांना एकदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं
दोघांच्या अफेअरबद्दल कुटुंबाला समजल्यानंतर खूप विरोध झाला. नवरा पिंटूने दोघांना एकदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. त्यानंतर विमलाच विशोकसोबत भेटणं बंद झालं. अखेर भेटण होत नसल्याने विमला विष प्राशन केलं. त्यानंतर विशोकने सुद्धा विष प्राशन केलं. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विशोकची आई गुडिया देवी काय म्हणाली?
विशोकची आई गुडिया देवीने सांगितलं की, विमला आणि विशोक दोघे मोबाइलवर बोलायचे. यावरुन दोन वर्षांपूर्वी सुद्धा वाद झालेला. नंतर यावर तोडगा निघाला. विमला देवीने विष पिऊन जीव दिला. आता मुलाने तेच केलय.
पोलीसही आमची FIR घेत नाहीयत
दुसऱ्याबाजूला विमलाच्या भावाने विशोकवर गंभीर आरोप केले आहेत. विशोक माझ्या बहिणीला त्रास द्यायचा. तिच्यासोबत संबंध ठेवायचा. त्यामुळेच विमलाने विष पिऊन जीव दिला. विमलाचा भाऊ बोलला की, पोलीसही आमची FIR घेत नाहीयत.
