AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : कुख्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल, भाडेकरुंची माहिती लपवून ठेवल्याचा ठपका

प्रमोद पांडे या मोहने येथील बांधकाम व्यावसायिकाने ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवत खडकपाडा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Kalyan Crime : कुख्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल, भाडेकरुंची माहिती लपवून ठेवल्याचा ठपका
गँगस्टर्सला आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखलImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 12, 2023 | 10:38 PM
Share

कल्याण : कुख्यात शार्प शूटर आणि दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या तीन आरोपींना कल्याण आंबिवलीत सहा महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद रामचंद्र पांडे असे या घरमालकाचे नाव असून, तो बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्यावर पोलिसांनी भाडेकरूची माहिती पोलिसांना कळवणे बंधनकारक असतानाही पोलिसांपासून ही माहिती लपवून ठेवल्याचा ठपका ठेवला आहे.

दोन दिवसांपूर्वी खत्री गँगच्या तिघांना घेतले ताब्यात

दोन दिवसांपूर्वी कल्याण आंबिवली परिसरातून पंजाब अॅन्टी गँगस्टर स्क्वॉडने महाराष्ट्र एटीएस टीमने तीन लोकांना ताब्यात घेतले होते. शिवम अवतार महालो, गुरमुख नरेशकुमार सिंह उर्फ गोरा अमनदीप, कुमार गुरमेलचंद उर्फ रन्चो अशी अटक झालेल्या खत्री गँगचे शूटर्सची नावे आहेत.

भाडेकरुची ओळख लपवल्याप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल

या आरोपींना अटक केल्यानंतर आता खडकपाडा पोलिसांनी घर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. नियमानुसार घातक कारवायांना आळा घालण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

घरमालकाची अधिक चौकशी सुरु

असे असतानाही प्रमोद पांडे या मोहने येथील बांधकाम व्यावसायिकाने ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवत खडकपाडा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पांडे हा बांधकाम व्यावसायिक असल्याने त्याने अशा प्रकारे पैशाच्या लालसेने किती भाडेकरूची माहिती लपवून ठेवत त्यांना आश्रय दिला याबाबतही पोलिसांकडून देखील सुरु आहे.

पंजाबमधील एका हत्या प्रकरणात हे आरोपी फरार होते. सहा महिन्यांपासून हे आरोपी आंबिवलीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती. या आरोपींवर बरेच गुन्हे दाखल असून पंजाबमधील ड्रग प्रकरणातही हे आरोपी वॉन्टेड होते.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.