Khalistani terrorists : खलिस्तानी दहशतवाद्यांची खळबळजनक माहिती यंत्रणांच्या हाती, यांचा नेमका प्लॅन काय होता?

सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईवर सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर आहे. या तिन्ही भागात खलिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलच्या मदतीने लोकांचे ध्रुवीकरण करत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

Khalistani terrorists : खलिस्तानी दहशतवाद्यांची खळबळजनक माहिती यंत्रणांच्या हाती, यांचा नेमका प्लॅन काय होता?
खलिस्तानी दहशतवाद्यांची खळबळजनक माहिती यंत्रणांच्या हाती
दादासाहेब कारंडे

|

May 11, 2022 | 8:55 PM

मुंबई : खलिस्तानी दहशतवादा (Khalistani terrorists) संदर्भात महाराष्ट्र पोलिसांना (Mumbai Police) अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईवर सुरक्षा यंत्रणांची (Security Agency) विशेष नजर आहे. या तिन्ही भागात खलिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलच्या मदतीने लोकांचे ध्रुवीकरण करत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. याशिवाय मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या एका तरुणावरही एजन्सींची नजर असून, हा तरुण ख्रिश्चन असताना शीख धर्माचा प्रचार करतो. शेतकरी आंदोलनादरम्यान या तरुणाने नवी मुंबईतील अनेकांना आपल्यासोबत दिल्लीला नेल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच खलिस्तानी दहशतवादी पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांचे महाराष्ट्राशी धागेदोरे असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा पुन्हा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

कसे पकडले गेले?

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि, आणि तेलंगणाची पोलीस पथकं सध्या हरियाणाच्या कर्नालमध्ये चार अटक केलेल्या बब्बर खालसा दहशतवाद्याांची चौकशी करण्यासाठी तळ ठोकून आहेत. त्यांना गुरुवारी तेलंगणातील आदिलाबाद येथे 7.5 किलो आरडीएक्स, 30 जिवंत काडतुसे, एक पिस्तूल आणि 1.3 लाख रुपयांची रोकड असलेली खेप पोहोचवण्यासाठी जात असताना अटक करण्यात आली. गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून ते पंजाबचे आहेत. कर्नाल पोलिसांनी रविवारी सांगितले की चार बीकेआय ऑपरेटर्सकडून जप्त करण्यात आलेल्या सहा मोबाईलमध्ये पाकिस्तानी सिमकार्ड आहेत. तेलंगणात आरडीएक्स आणि दारुगोळा कोणाला मिळणार होता याबाबत अधिका-यांना अद्याप माहिती नाही. या वर्षी मार्चमध्ये नांदेडला कशाची डिलिव्हरी करण्यात आली याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

यांचा नेमका प्लॅन काय होता?

अटक केलेल्या चार जणांच्या चौकशीत उघड झाले आहे की पंजाबच्या मुथियानवाला गावातील शेतात ड्रोन वापरून ही खेप एअरड्रॉप करण्यात आली होती. मुथियानवाला गावात आकाशदीपच्या नातेवाइकांची शेती असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेले आकाशदीप आणि जशनप्रीत सिंग हे गुरप्रीत टोळीचे आहेत. आम्ही शस्त्रे आणि स्फोटकांची वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. सध्या तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. फिरोजपूर आणि तरणतारण सीमेवरील गावांमध्ये रात्री ड्रोनची हालचाल वारंवार होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यांचा नेमका प्लॅन काय होता? याचा शोध घेण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें