AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छेडछाडीतून तरुणाचा खून, पाच वर्षांनंतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

कुपवाड येथील एका खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे

छेडछाडीतून तरुणाचा खून, पाच वर्षांनंतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा
| Updated on: Jan 28, 2021 | 11:37 AM
Share

सांगली : कुपवाड येथील एका खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे (Kupwad Five Sentenced To Life Imprisonment For Murder Case). सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. तसेच, या खटल्यात फितूर साक्षीदारावर न्यायालयाने फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. कथित मुलीच्या छेडछाडीतून साजन रमेश सरोदे, या तरुणाचा खून झाल्याची घटना 5 वर्षांपूर्वी घडली होती (Kupwad Five Sentenced To Life Imprisonment For Murder Case).

पाच जणांनी मिळून केला होता खून

कुपवाड शहरातील भारत सूतगिरणी याठिकाणी 19 जानेवारी 2016 ला साजन रमेश सरोदे (वय 24) या तरुणाचा धारधार शस्त्रांनी खून करण्यात आला होता. या तरुणाचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकण्यात आला. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

प्रत्यक्षदर्शी कोणत्याही प्रकारचे पुरावा नसल्याने या खुनाचा छडा लावणे पोलिसांच्या समोर आव्हान होते. अखेर पोलिसांनी सखोल तपास करत या खून प्रकरणी गजानन प्रकाश गवळी (वय 28), बंडया उर्फ नरसगोंडा (वय 32), हणमंत आनंदा कांबळे (वय 24), आप्पा उर्फ सिताराम पांडूरंग मोरे (वय 24), मौला अब्दुल मुल्ला (वय30) या पाच जणांना अटक करण्यात आली होती. कथित मुलीच्या छेडछाडीच्या करणातून साजन सरोदे याचा खून करण्यात आल्याचा प्रकार पोलीस तपासात पुढे आलं होतं.

एकाचवेळी पाच जणांना जन्मठेप

या हत्येप्रकरणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. ज्यामध्ये पाच जणांविरोधात असणारे परिस्थितीजन सबळ पुरावे आणि 14 साक्षीदारांची साक्ष याआधारे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी आरोपी गजानन प्रकाश गवळी, बंडया उर्फ नरसगोंडा आदगोंडा चिंचवाडे, हणमंत आनंदा कांबळे, आप्पा उर्फ सिताराम पांडूरंग मोरे आणि मौला अब्दुल मुल्ला यांना भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये दोषी धरुन सश्रम कारावासाची जन्मठेप आणि प्रत्येकी रक्कम रुपये 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

तसेच, दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. एकाच वेळी पाच जणांना सांगली जिल्ह्यात बऱ्याच वर्षांनी शिक्षा मिळाली आहे.

फितूर साक्षीदारावर फौजदारीचे आदेश

या खटल्यात फितूर साक्षीदाराबाबत न्यायालयाने खोटे पुरावे सादर केल्याची गंभीर दखल घेत फितूर साक्षीदार ओमकार जाधव यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. यामुळे फितूर साक्षीदारांना एक धडा मिळाला आहे. या खटल्याचे काम सरकारी पक्षाकडून वकील विनायक मधुकर तथा बाळासाहेब देशपांडे यांनी पाहिले.

Kupwad Five Sentenced To Life Imprisonment For Murder Case

संबंधित बातम्या :

खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचं बेकायदा पिस्तूल रॅकेट समोर, 10 काडतुसांसह सात पिस्तूल हस्तगत

तुमच्या खिशातली नोट नकली तर नाही? मुंबईत नकली नोटा छापणारे अटकेत

देवाकडून कोरोनाची निर्मिती, मी विषाणूचा मानवी अवतार, दोन लेकींच्या हत्येनंतर महिलेचा विचित्र दावा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.