मुलाच्या अल्पवयीन प्रेयसीला वेश्या व्यवसायात ढकललं, लातुरात महिलेसह सहा जणांना बेड्या

मुलाच्या अल्पवयीन प्रेयसीला वेश्या व्यवसायात ढकललं, लातुरात महिलेसह सहा जणांना बेड्या

लातूरमध्ये अल्पवयीन तरुणीला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या प्रियकराच्या आईला अटक झाली आहे

अनिश बेंद्रे

|

Dec 22, 2020 | 3:57 PM

लातूर : मुलाच्या अल्पवयीन प्रेयसीला वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. घरातून पळाल्यानंतर पीडित तरुणी प्रियकराच्या घरी राहत होती. मात्र पैशांच्या हव्यासातून त्याच्या आईने तरुणीवर ही दुर्दैवी वेळ आणली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Latur Lady sells minor girl Crime News)

लातूरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीचं एका अल्पवयीन तरुणावर प्रेम होतं. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरातून पळ काढल्यानंतर पीडिता प्रियकराच्या घरी राहायला आली. सुरुवातीला प्रियकराच्या आईने तिला ठेवून घेतले. मात्र काही दिवसांनी त्याच्या आईने उचललेल्या धक्कादायक पावलामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

प्रियकराची आई अर्थात आरोपी महिलेने पीडित अल्पवयीन तरुणीला चक्क कला केंद्राकडे पाठवले. त्या मोबदल्यात तिने काही पैसेही घेतेल. मात्र पीडिता अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव तिला परत पाठवण्यात आले. कला केंद्रातून परत आल्यानंतरही पीडितेच्या दुर्दैवाचे दशावतार थांबले नाहीत. प्रियकराच्या आईने तिला पुन्हा बीडमधील अंबाजोगाईच्या एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेकडे ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर पैसे देऊन दोघांनी लैंगिक अत्याचार केले.

पीडितेची प्रकृती बिघडल्याने पुन्हा तिला प्रियकराच्या आईच्या हवाली करण्यात आले. मात्र महिलेने तिचा छळ एवढ्यावर थांबवला नाही. तिला पुन्हा दुसऱ्या कला केंद्रात पाठवण्यात आले. अखेर पीडित तरुणीने मोठ्या हिमतीने पोलिसांकडे धाव घेत आपली हकिगत सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

भोपाळमध्ये बहिणीने फसवलं

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये मोठ्या बहिणीनेच धाकट्या अल्पवयीन बहिणीला वेश्या व्यवसायात (Sex Trade) ढकलल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. या बहिणीने आपल्या बहिणीला प्रथम अमली पदार्थांचे व्यसन लावले. त्यानंतर तिला वेश्या व्यवसायात जाण्यासाठी प्रवृत्त केले. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीसह सहा जणांना अटक केली.

संबंधित बातम्या : 

व्यसनाची सवय लावून लहान बहिणीलाच वेश्या व्यवसायात ढकलले

चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करुन जिवंत गोणीत बांधून फेकले, पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकलीला जीवनदान

(Latur Lady sells minor girl Crime News)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें